Congress Candidate List : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस मैदानात उतरली आहे. काँग्रेसने महाविकास आघाडीत सर्वात जास्त उमेदवार घोषित केले आहेत. काँग्रेसने आत्तापर्यंत 99 जागांवर उमेदवार घोषित केले आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 85 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 76 जागांवर उमेदवार जहीर केला आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी दक्षिण सोलापूरचा उमेदवार घोषित केला होता. त्या जागेवर आता काँग्रेसने दिलीप मानेंना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवाय पंढरपूरमध्ये काँग्रेसने दिवंगत भारत भालके यांचे पुत्र भगिरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिलीप माने म्हणाले,"मित्रपक्ष आम्हाला साथ देईल, अन्यथा आम्ही मैत्रीपूर्ण लढतीला ही तयार आहोत". यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडून अमर पाटील यांना दक्षिण सोलापुरात उमेदवारी जाहीर झालीय. त्यामुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण झालाय. प्रणिती शिंदे यांनी जागा खेचून उमेदवारी दिल्याबद्दल माने यांनी मानले त्यांचे आभार आहेत. 

काँग्रेसची 99 उमेदवारांची यादी 

1. अक्कलकुवा - ॲड. के.सी. पडवी (ST)2.शहादा - राजेंद्रकुमार कृष्णराव गावित (ST)3. नंदुरबार - किरण दामोदर तडवी (ST)4.नवापूर -  श्रीकृष्णकुमार सुरुपसिंग नाईक (ST)5.साक्री - एसटी प्रवीणबापू चौरे6.धुळे ग्रामीण -  कुणाल रोहिदास पाटील7.रावेर - ॲड. धनंजय शिरीष चौधरी8.मलकापूर - राजेश पंडितराव एकाडे9.चिखली - राहुल सिद्धिविनायक बोंद्रे10.रिसोड - अमित सुभाषराव झनक11.धामणगाव रेल्वे -प्रा.वीरेंद्र वाल्मीकराव जगताप12.अमरावती - डॉ. सुनील देशमुख13.तिवसा - ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर14.अचलपूर - अनिरुद्ध @ बबलूभाऊ सुभानराव देशमुख15.देवळी - रणजित प्रताप कांबळे16.नागपूर दक्षिण पश्चिम -  प्रफुल्ल विनोदराव गुडधे17.नागपूर मध्यवर्ती -  बंटी बाबा शेळके18.नागपूर पश्चिम -  विकास पी. ठाकरे19.नागपूर उत्तर - SC डॉ. नितीन काशिनाथ राऊत20 साकोली -  नानाभाऊ फाल्गुनराव पटोले21.गोंदिया-  गोपालदास शंकरलाल अग्रवाल22.राजुरा-  सुभाष रामचंद्रराव धोटे23.ब्रह्मपुरी -  विजय नामदेवराव वडेट्टीवार24.चिमूर -  सतीश मनोहरराव वारजूकर25.हदगाव -  माधवराव निवृत्तीराव पवार पाटील26 भोकर-  तिरुपती बाबुराव कदम कोंडेकर27 नायगाव - मीनल निरंजन पाटील (खतगावकर)28 पाथरी - सुरेश अंबादास वरपुडकर29 फुलंब्री -  विलास केशवराव औताडे30 मीरा भाईंदर - सय्यद मुजफ्फर हुसेन31 मालाड पश्चिम - अस्लम आर. शेख32 चांदिवली - मोहम्मद आरिफ नसीम खान33 धारावी - डॉ.ज्योती एकनाथ गायकवाड (ST)34 मुंबादेवी - अमीन अमीराली पटेल35 पुरंदर - संजय चंद्रकांत जगताप36 भोर - संग्राम अनंतराव थोपटे37 कसबा पेठ - रवींद्र हेमराज धंगेकर38 संगमनेर - विजय बाळासाहेब थोरात39 शिर्डी - प्रभावती जे.घोगरे40 लातूर - ग्रामीण धिरज विलासराव देशमुख41 लातूर शहर - अमित विलासराव देशमुख42 अक्कलकोट - सिद्धाराम सातलिंगप्पा म्हेत्रे43 कराड दक्षिण - पृथ्वीराज चव्हाण44 कोल्हापूर दक्षिण - ऋतुराज संजय पाटील45 करवीर - राहुल पांडुरंग पाटील46 हातकणंगले - राजू जयंतराव आवळे (SC) 47 पलूस-कडेगाव - डॉ.विश्वजीत पतंगराव कदम48 जत - विक्रमसिंह बाळासाहेब सावंत49 अमळनेर - अनिल शिंदे 50 उमरेड- संजय मेश्राम51 आरमोरी - रामदास मश्राम52. चंद्रपूर - प्रवीण पडवेकर53 बल्लारपूर - संतोषसिंह रावत 54 वरोरा- प्रवीण काकडे55 नांदेड उत्तर- अब्दुल सत्तार अब्दुल गफार56 ओरंगाबाद पूर्व- लहू शेवाळे 57 नालासोपारा- संदीप पांडेय 58 अंधेरी पश्चिम- अशोक जाधव59 शिवाजीनगर-दत्तात्रय बहिरट60 पुणे छावणी- रमेश बागवे61 सोलापूर दक्षिण- दिलीप माने62 पंढरपूर- भगिरथ भालके63 भुसावळ - राजेश मानवतकर64 जळगाव - स्वाती वाकेकर65 अकोट - महेश गणगणे66 वर्धा - शेखऱ शेंडे67 सावनेर - अनुजा केदार68 नागपूर दक्षिण - गिरिश पांडव69 कामठी - सुरेश भोयर70 भंडारा - पूजा ठवकर71 अर्जुनी मोरगाव - दिलिप बनसोड72 आमगाव - राजकुमार पुरम73 राळेगाव - वसंत पुरके74 यवतमाळ - अनिल मांगुळकर75 आर्णी - जितेंद्र मोघे76 उमरखेड - साहेबराव कांबळे77 जालना - कैलास गोरंट्याल78 वसई : विजय पाटील79  कांदिवली पूर्व -:काळू बधेलिया80 चारकोप - यशवंत सिंग81 सायन कोळीवाडा : गणेश यादव82 श्रीरामपूर : हेमंत ओगले83 निलंगा : अभय कुमार साळुंखे84  शिरोळ : गणपतराव पाटील85 राणा सानंदा - खामगाव 86 हेमंत चिमोटे - मेळघाट87  मनोहर पोरेटी - गडचिरोली88  दिग्रस - माणिकराव ठाकरे89  नांदेड दक्षिण - मनोहर अंबाडे90  देगलूर - निवृत्तीराव कांबळे91 मुखेड - हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर92 एजाज बेग - मालेगाव मध्य 93शिरीष कुमार कोतवाल - चांदवड94 लकीभाऊ जाधव - इगतपुरी95 भिवंडी पश्चिम -दयानंद चोरगे 96 वांद्रे पश्चिम - असिफ झकारीया 97 तुळजापूर - कुलदीप पाटील98 कोल्हापूर उत्तर राजेश लाटकर99 सांगली - पृथ्वीराज पाटील

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Congress Candidate List: काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा