मुंबई : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीचा वाद आता मिटलेला आहे. या मतदार संघासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे आग्रही होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी राज्यसभेचे आश्वासन दिल्यामुळे रामदास आठवले यांनी माघार घेतली आहे. स्वतः आठवले यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
रामदास आठवले म्हणाले की, दक्षिण मध्य मुंबईतून मी याआधी निवडून आलो होतो. त्यामुळे इथे मला संधी मिळावी अशी इच्छा होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर माझे व मित्र पक्षांचे याबाबत बोलणेदेखील झाले होते. त्यामुळे मला जागा मिळायला हवी होती. परंतु काल (शनिवारी)माझे मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले, तेव्हा त्यांनी मला राज्यसभेचे आश्वासन दिले आहे. तसेच मी कॅबिनेट मंत्रीपदाची अपेक्षा मुख्यमंत्र्यासमोर ठेवली आहे.
रामदास आठवले यांनी माघार घेतल्यानंतर पुन्हा एकदा दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे यांना उमेदारी देण्यात आली आहे. राहुल शेवाळेंच्या उमेदवारीला आठवले यांनी पाठिंबा दिला आहे. आठवले याबाबत म्हणाले की, राहुल शेवाळे माझे चांगले मित्र आहेत. मी आणि माझे कार्यकर्ते शेवाळेंच्या प्रचारात सहभागी होणार आहोत. आम्ही त्यांना प्रचंड बहुमतांनी निवडून आणू.
मुख्यमंत्र्यांनी राज्यसभेचे आश्वासन दिल्यामुळे मी राहुल शेवाळेंना साथ देणार : रामदास आठवले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Mar 2019 02:53 PM (IST)
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीचा वाद आता मिटलेला आहे. या मतदार संघासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे आग्रही होते. परंतु रामदास आठवले यांनी आता माघार घेतली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -