प्रदीप शिंदे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपीने केलेल्या चाकू हल्ल्यात आणखी दोघेजण गंभीर जखमी आहेत. याप्रकरणी आरोपी राजेंद्र कारंडे (43 ) यास कडेगाव पोलिसांनी अटक केली आहे.
संदीप शिंदे आणि प्रदीप शिंदे यांची चुलत बहीण आणि संशयित आरोपी राजेंद्र कारंडे यांच्यात प्रेमसंबंध होते. सदर महिला विवाहानंतर सासरी राहत होती. परंतु गेल्या काही महिन्यांपासून ती कडेगाव तालुक्यातील उमरकांचनमध्ये राहायला आली. तिच्याशी असलेले संबंध राजेंद्र याने पुढे वाढवू नयेत आणि शिंदे यांच्या घराची बदनामी करु नये म्हणून आरोपी राजेंद्र कारंडे यास समज देण्यासाठी संदीप शिंदे आणि प्रदीप शिंदे यांनी त्यांच्या घरी बोलवून घेतले. यावेळी जोरदार वादवादी झाली. यावेळी वादाचे पर्यावसन मारामारीत झाले. यावेळी आरोपी राजेंद्र कारंडे खिशातून आणलेल्या चाकूने प्रदीप शिंदे यांच्या पाठीवर आणि पोटात भोसकले. यात प्रदीप शिंदे याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याला कडेगाव न्यायालयात हजर केले असता 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.