Maharashtra Politics अमरावती : राज्यात गेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वात हायव्होल्टेज लढाई असणार्‍या काही मतदारसंघात अमरावतीचा (Amravati) समावेश आहे. कारण हा मतदारसंघ गेल्या निवडणुकीत महायुतीसाठी (Mahayuti) काहीसा डोकेदुखी ठरल्याचे बघायला मिळाले आहे. कारण महायुतीतील घटकपक्ष असेलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि दर्यापुरचे माजी आमदार कॅप्टन अभीजीत अडसूळ (Navneet Rana) आणि माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यातील वाद वेळोवेळी उफाळून आला आहे.


दरम्यान, आता हाच वाद विधानसभा निवडणुकीतही बघायला मिळतो आहे. कारण नवनीत राणा आणि कॅप्टन अभिजित अडसूळ (Captain Abhijeet Adsul) यांच्यावर जोरदार वार- पलटवर करत शाब्दिक चकमक रंगली आहे. अशातच अमरावती भाजप कार्यालयात काही दिवसांपूर्वी बडनेराचे उमेदवार रवी राणा यांची बैठक झाली. त्यामध्ये रवी राणा यांनी अमरावतीची एक जागा कमी झाली तरी चालेल पण कमळ निवडून आले पाहिजे, असे वक्तव्य केलं होतं. परिणामी आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुलभा खोडके विरुद्ध राणांमध्ये खडाजंगी रंगली असताना अजित पवारांकडून रवी राणांची कानउघडणी करण्यात आलीय. त्यानंतर आता भर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राणा दाम्पत्याला इशारा देत महायुतीची शिस्त पाळण्याचा सल्ला दिला आहे.


राणा दाम्पत्याने महायुतीत राहून बंडखोरी करू नये- एकनाथ शिंदे


लोकसभेत महायुतीचे सरकार तुमच्या पाठीशी उभे राहिले, महायुतीमध्ये कॅप्टन अभिजीत असून ते देखील आमच्या सरकारसाठी गरजेचे आहेत. महायुतीची शिस्त राणा दाम्पत्याने पाळावी. महायुतीत राहून बंडखोरी करू नये, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी राणा दाम्पत्याला दिला आहे. आगामी काळात महायुतीच्या कामाची पोच पावती जनता दिल्याशिवाय राहणार नाही. हे सरकार सर्वसामान्य जनतेसाठी आहे. मतदारसंघातले सगळे प्रश्न आपण मार्गी लावू. त्यासाठी 20 तारखेला कॅप्टन अभिजीत अडसूळ यांचं विमान उडवा असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी जनतेला केलंय. 


....तो फिर मैं खुद की भी सुनता


आमचे सरकार हे देणारे सरकार आहे, घेणारे नाही. 20 नोव्हेंबर तारखेला मतदान झाल्यानंतर डिसेंबरचा हप्ता देखील बहिणीच्या खात्यात जमा होईल. रामाच्या ब्रीद वाक्यप्रमाने प्राण जाय पर वचन न जाये प्रमाणे आमचे सरकार आहे. एक बार खुद से कमिटमेंट कर दे तो मै खुद की भी नही सुनता, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी शेरोशायरीतून विरोधकांना प्रत्युत्तर देत लक्ष्य केलंय. शेतमालाचे भाव खाली पडल्यास शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना मी सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या मागे सरकार खंबीरपणे उभे राहील. ही महायुती एक जीव महायुती आहे. महायुती सरकारने दोन वर्षात भरपूर काम केलीय, अडीच वर्षात महाविकास आघाडीने काय काम केलं दाखवावं, असे थेट महाविकास आघाडीला एकनाथ शिंदे यांनी आव्हान दिले आहे.


संबंधित बातमी:


Avinash Jadhav: मला एक संधी द्या, हातात फलक, खांद्यावर उपरणं...; राज ठाकरेंचा अविनाश जाधव थेट ठाणे रेल्वे स्थानकावर, Photo's