Maharashtra Politics अमरावती : अमरावती जिल्ह्याच्या बडनेरा विधानसभेचे आमदार आणि महायुतीतील घटक पक्ष असलेल्या युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रवी राणा (Ravi Rana) यांनी केलेले एक वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे. यावेळी एका सभेत बोलताना रवी राणा यांनी अमरावतीची एक जागा निवडून आली नाही तर काही होत नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. दरम्यान याच वक्तव्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून (Ajit Pawar) रवी राणा यांची कानउघडणी करण्यात आली आहे. शिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) रवी राणांना समज द्यावी, असा सल्लाही दिला आहे. आज (मंगळवार) अजित पवार अमरावती येथे आले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया देत यावर भाष्य केलंय.
पत्नीच्या पराभवाला रवी राणांच कारणीभूत- अजित पवार
अमरावतीची एक जागा निवडून आली नाही तर काही होत नाही, असं वक्तव्य रवी राणा यांनी केलं होतं.. त्यावर अजित पवार यांनी रवी राणा यांची कान उघडणी केली असून रवी राणांना वाचाळवीर म्हणून संबोधले आहे. तसेच रवी राणा विनाशकाले विपरीत बुद्धी असल्या सारखे आहेत. त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. किंबहुना स्वतःच्या बोलण्यातून ते त्यांच्या पत्नीच्या पराभवाला कारणीभूत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना योग्य पद्धतीने समज द्यावी, असा सल्ला अजित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देत रवी राणांबाबत आपले परखड मत व्यक्त केलंय.
लोकं काही काही बोलत असतात आपण प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायचं नसतं. लोकांना फार नकारात्मक बोललेलं आवडत नाही. विधानसभेला मी पण रवी राणांचा दोनदा समर्थन केल आहे. देवेंद्र फडणवीस यांनी योग्य पद्धतीने रवी रानाला समजावून सांगितलं पाहिजे, असा सल्ला अजित पवारांनी दिला आहे.
नवनीत राणांना गेट विल सून, लवकर बरे व्हा!- सुषमा अंधारे
दरम्यान, याच मुद्यावरुन शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी टीका करत यावर भाष्य केलंय. रवी राणा यांना ही निवडणूक जड जात आहे. रवी राणा हे पैशांची निवडणूक लढवत आहे. लोकसभेमध्ये नवनीत राणाला पराभूत करून गुंडशाहीला उत्तर जनतेने दिलंय. तसेच नवनीत राणाला भान असलं पाहिजे. त्यांना गेट विल सून, लवकर बरे व्हा. असे म्हणत सुषमा अंधारे रांनी टीका केली आहे. तर रवी राणा हे विनाशकालीन बुद्धी आहे, तर तिकीट देतांना तुम्हाला कळलं नाही का. राणा यांना माहिती आहे, आपला पराभव झाला आहे. लोकं कंटाळले होते राणाला. भाजपला गुडव्हील करायचं आणि निवडणूक लढायची. पण यांना माहीत नाही ते पराभवच्या खाईत चालले. असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.
हे ही वाचा