Avinash Jadhav: मला एक संधी द्या, हातात फलक, खांद्यावर उपरणं...; राज ठाकरेंचा अविनाश जाधव थेट ठाणे रेल्वे स्थानकावर, Photo's
ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार अविनाश जाधवांचा आज ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात आगळावेगळा प्रचार केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहातात फलक, खांद्यावर उपरणं घालत अविनाश जाधव यांनी थेट ठाणे रेल्वे स्टेशन गाठले.
ठाणेकरांनो मला एकदा संधी द्या...असं लिहिलेलं फलक हातात घेऊन अविनाश जाधव यांनी नागरिकांना आवाहन केले.
अविनाश जाधव यांच्या या प्रचाराला ठाणे स्टेशन परिसरात येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आले.
अविनाश जाधव यांच्या या प्रचाराला मनसे नेते अभिजीत पानसे, रवींद्र मोरे यांच्यासह इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते.
विधानसभेच्या निवडणुकीत ठाणे विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
ठाणे विधानसभा मतदारसंघात भाजपकडून संजय केळकर शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार राजन विचारे आणि मनसेकडून उमेदवार अविनाश जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून भाजपचे संजय केळकर हे दोनदा निवडून आले आहेत.