Continues below advertisement

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्रफडणवीस यांनी महापालिका निवडणुकांच्या (Election) पार्श्वभूमीवर सभांचा, रोड शो आणि मुलाखतींचा धडाका लावला आहे. वेगवेगळ्या माध्यमातून ते जनतेपर्यंत पोहोचत आहेत. एबीपीमाझाच्या कॉफी विथ कौशिक कार्यक्रमात त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्द्यांवर भाष्य केले, सर्वच प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी, आदित्य ठाकरेंनीफोटो दाखवलेल्या मुंबईतील कोस्टल रोड आणि उद्धव ठाकरेंनी दिलेल्या 1 लाख रुपयांच्याचॅलेंजवरही भूमिका मांडली. तसेच, राज ठाकरेंनी आपल्या प्रेझेंटेशनमधून मुंबईतील (Mumbai) विमानतळाची जागा हडपण्याचा आणि मुंबई ताब्यात घेण्याचा डाव असल्याची टीका केली होती. त्यावरही फडणवीसांनी उत्तरे दिले, जोपर्यंत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहे तोपर्यंत कोणाचा बाप मुंबईला हात लाऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले.  

महापालिका निवडणुकांसाठीप्रचाराची ही पद्धत मी स्वत: तयार केली, आपल्याकडे कमी वेळ आहे मग मी प्लान केला की काही ठिकाणी रोड शो, काहीसभा, काहीठिकाणीमुलाखती करायच्या. त्यातून आपला अजेंडा सर्वत्र पोहचविता येतो आणि लोकांपर्यंत आपण चांगल्या पद्धतीने पोहचतो, असे फडणवीसांनीसांगितले.

Continues below advertisement

उद्धव ठाकरेंच्या टीकेवर पलटवार करत फडणवीस म्हणाले, मी विनंती करतो की, कृपयाजाऊनठाकरेंकडून माझे एक लाख रुपये घेऊन या. कारण, मी मुंबई सोडून सगळीकडे फक्त विकासावर बोलत आहे आणि मुंबईत मी उत्तर देत आहे. त्यामुळेमाझे1लाखरुपयेघेऊनया, असे फडणवीस यांनी म्हटले. उद्धव ठाकरेंनीदेवेंद्रफडणवीसांनाचॅलेंज दिले होते. भाजपने हिंदू मुस्लिम केली नाही, अशी निवडणूक दाखवा आणिमाझ्याकडून1लाखरुपये, असेठाकरेंनी म्हटले होते. माझा लेंज अस होत की, उद्धव ठाकरे यांचे विकासावरचे भाषण दाखवा आणि सात हजार घेऊन जा, असेहीफडणवीसांनीसांगितले.

कोस्टलरोडवरुनफडणवीसांचापलटवार

आमचे प्रकल्प चोरले ह्यावर राइट ब्रदर्सने विमानाचा शोध लावला, पुष्पक विमान तर रामायणातही होते मग राईटब्रदरला का श्रेय देतो, हा जो कोस्टल रोड आहे, ही संकल्पना जुनी होती. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलेकी, ्याप्रोजेक्टवरराज्यात सरकार त्यांचे होते, पण काही झाले नाही. मग मी मुख्यमंत्री झालो, 2 वर्ष पाठपुरावा केला आणि मोदीजीयांच्यासोबत5 बैठका झाल्या.एकनाथ शिंदे एमएसआरडीसीचे मंत्री होते, एमएमआरडीए करायला तयार होते तेव्हा उद्धवसाहेब सोबत होते, त्यांनीच महापालिकेला तो रोड करू द्यावे म्हटले. मग आम्ही म्हटल की, महानगरपालिकेने करूद्या, कोर्टातकेस झाली आणि आम्ही जिंकलो. मी मुख्यमंत्री असताना मला न सांगता कोस्टल रोडचेभूमिपूजन करण्यात आले, मला एक अधिकाऱ्यानेसांगितले की भूमिपूजन करत आहेतुम्हीसांगालतरपुन्हा करू, तेव्हा मी म्हटलो त्यांना भूमिपूजन करू द्या, मी उद्घाटन करेल. आम्ही पाहिलाआणि दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन केले.मात्र, त्यांनी लपून-छपून भूमिपूजन केले, अशीमाहितीदेवेंद्रफडणवीसयांनीदिली.

सध्याचंराजकारणमहिलाकेंद्रीत

आताचेजेराजकारणआहेतेमहिलासेंट्रिकहोऊलागलेआहे, मोदींनीविधानसभाआणिलोकसभेतआरक्षणदेण्याससुरुवातकेली, तेव्हापासूनमहिलाअधिकजास्तीनेकामकरूलागल्याआहेत. नारीशक्तीचाअजेंडाआम्हीघेतलाआहे. देवाभाऊम्हणूनमीइस्टॅब्लिशझालोआहे, आताबहीणआणिभाऊसगळेमलादेवाभाऊचबोलतआहेत.

महापालिकेतमोठाभ्रष्टाचार

महापौरपद त्यांच्याकडे, स्टडिंगकमिटीपद त्यांच्याकडे, दोन्ही महत्त्वाची पदे त्यांच्याकडे, आम्हाला एखाद दुसरे पद मिळायचे. सत्ता काग्रेसची होती पण त्यांचे काही नसायचे. मी मुख्यमंत्री झालो आणि मला तक्रार आली की, 200 रस्त्यांमध्ये डांबराखाली पीक्यूसीलेवलनव्हती. मग मीअॅक्शनघेतली, जेलमध्येटाकलेआणिठेकेदारांनाब्लॅकलिस्टकेले, असेहीफडणवीसांनीम्हटले. 2017च्यानिवडणुकीतआमचे82 नगरसेवकआले, त्यांचे84निवडूनआलेहोते.शिंदेसाहेबआणिनार्वेकरांनी मला फ़ोनकेला, उद्धवठाकरेदरवाजा बंद करून बसले होते. त्यावेळी, आम्हीठरविलेकी, आम्ही महापालिकेतवाचडॉगसारखेबसू. पण, ह्यांनीकचरा घोटाळा केलाआणिहजारोकोटीरुपयेखाल्ले, पर्यावरणच्या गोष्टी करतात, मिठ्ठी नदी गाळाच्या गोष्टी करतात, पण यांनी गाळ खाल्ला, असागंभीरआरोपदेवेंद्रफडणवीसांनीकॉफीविथकौशिककार्यक्रमातूनकेला.

कोविडमध्येहीपैसेखाल्ले

कोविडच्या घोटाळ्यात कोणाचे जावई होते, जे जेलमध्येकोट्यावधीरुपयेघेऊनकोविडसेंटरखोलले.डॉक्टर, नर्सआणिस्टाफच्यानावानेपैसेखाल्ले. शेडोलोककोविडमध्येमृत्युमुखीपडले, कसायापेक्षाकायउपमाद्यायची, अशाशब्दातफडणवीसांनीकोविडकाळातीलघोटाळ्यावरभाष्यकेलं. रेमिि्हइंजेक्शन, कफन बॉडीबॅगचा घोटाळा, खिचडी घोटाळा केला, यांच्या घोटाळ्याच्या कहाण्या मी सांगू लागलो तर मल दिवस पुरणार नाही, असेहीमुख्यमंत्र्यांनीम्हटले.

अजितपवारअन्आदित्यठाकरेंवरटीका

आदित्यला प्रमोट करण्याचा ते खूप प्रयत्न करत आहेत. पण ते जमू नाही राहिले आदित्यसाठी माझी गरज काय? माझा एखादा वार्ड अध्यक्ष करेल किंवा एखादा उमेदवार करेल,असेम्हणतआदित्यठाकरेंनीकेलेल्याटीकेवरदेवेंद्रफडणवीसांनीपलटवारकेला. तसेच, पुण्यात अजितदादांनी टीका इतकी केली, त्यावर मी संयम पाळला, मी टीका केली नाही. पण, त्यांनी पातळी सोडून टीका केली ती अयोग्य आहे, त्याचे मला दुःख झाले, असेहीफडणवीसांनीम्हटले.

महायुतीतकायठरलं

मुंबईत म्ही थेट भूमिका घेतली की, तुमचे अध्यक्ष नवाब मलिक होते म्हणून आम्ही सोबत लढणार नाही. पुण्यातही मी संगितलेहोते,म्ही एकत्र लढणार नाही, आमची मैत्रीपूर्ण लढत नाही. लिहून घ्या आम्हाला युतीमध्ये कोणाची गरज पडणार नाही, भाजप शिवसेना रिपाइंयुती बहुमतापेक्षा जास्त आकडे येतील, असाविश्वासदेवेंद्रफडणवीसयांनीव्यक्तकेला. मुंबईमध्ये आमचे 15 आमदार आहेत, त्यांचे 5 म्हणजे रेशोकाय असला पाहिजे 35:65 पण आम्ही 45:55 केल आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही 45 जागा घेतल्या, त्यांना 55 जागा दिल्या. महापौरपद सोडल नाही, युतीचा महापौर होईल. अद्याप ठरलेल नाही, मुंबईतही तसेच असेल निर्णय युती म्हणून घेऊ, असेफडणवीसांनीसांगितले.

देवेंद्रफडणवीसअसेपर्यंत कोणी मुंबईला हात लाऊ शकत नाही

मुंबई हा भूभाग आहे, काही चालत नेता येणार नाही. मुंबई अशी कशी कोण घेईल, कोणाच्या बापाची आहे का?मी सांगतो देवेंद्रफडणवीस आहे तोपर्यंत कोणाचा बाप मुंबईला हात लाऊ शकत नाही, हे काय लेचेपेचे नेते आहेकाय, असेहीफडणवीसांनीम्हटले. मराठी माणसासाठी यांना बोलायचं अधिकार नाही. बाळासाहेब यांना बोलायचा अधिकार होता. त्यांची 25 वर्ष सत्ता होती, त्यांच्यामुळे मराठी माणूस मुंबईबाहेर गेला. बीडीडीचा निर्णय मी घेतला, बिल्डर येणार नाही हे मी सांगितल, आम्हीचचाव्या दिल्या. पत्रा चाळ उदाहरण आहे, यांन लाजेने मान खाली घालायला लागत आहे. मराठी अस्मिताची नाळ असलेली पत्रा चाळ आहे, यांनी घोटाळा केला. मात्र, मी मुख्यमंत्री झाल तेव्हा पत्रा चाळघोटाळबाज लोकांच्या हातातून घेतले. तुम्ही गिरणी कामगारांसाठी मोर्चा काढला मग जेव्हा त्यांच्या जागी मोठे मोठेटॉवर होत होते, तेव्हा तुम्ही अट का घातलीनाही? असा सवाल फडणवीसांनी विचारला. पालिकेतील कंत्राटदारही अमराठी ठेवले आहेत, हे काय मराठी सांगतात, हे मराठीचे राजकारण करत आहे.

अदानींनाएअरपोर्टचेटेंडरकसेमिळाले?

मुंबईतअदानी आता आले नवी मुंबईच्या एयरपोर्टचेटेंडर मी काढले, त्याचे टेंडरजिविके कंपनीला गेले होते, त्यांनी त्यांचे शेअरडाइल्यूट केले आणि मग अदानींना गेले. सन1984 साली राजीव गांधी यांनी सांगितले होते की, धारावीच विकास करायचा, ते त्यांना जमले नाही ते काममोदीजींचे सरकार आल्यावर आम्ही सुरू केले. त्याचे वर्कऑर्डरअदानीला दिले नव्हते, यांने यांचे सरकार आल्यावर ते काढून अदानीला दिले. त्यांनी नॉर्म्स केले ते आमही बदलले, टीडीआरचमोनोपॉली दिली, टीडीआरची किंमत रेडी ेकरने90% केली, यांचे खायचे दात वेगळे आहे आणि दाखवायचे वेगळे आहे, असेराजठाकरेंनीम्हटले.

उद्धव ठाकरेंमध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम इगोचा

उद्धव ठाकरेची मैत्री ह्यावरही फडणवीस स्पष्टच बोलले. उद्धव ठाकरे एक अनप्रेडिक्टेबल व्यक्ती आहेत, त्यांचा प्रॉब्लमईगोआहे. आपल्या ईगोसाठी ते आपल्या घरालाही आग लावून मज्जा करू शकतात. एक असतो आत्माभिमान जो बाळासाहेबयांच्यात होता, म्हणून शिवसेना उभी राहिल, अशा शब्दात उद्धव ठाकरेंच्या मैत्रीबाबतही फडणवीसांनी भूमिका मांडली. आमची वैचारिक दृष्ट्या विचार आणि भूमिका वेगळी आहे, पण एकमेकांचे शत्रू नाही. त्यामुळे 16 नंतर आम्ही चहा पिताना दिसू तर काय विचार करू नका, असेहीफडणवीसांनीम्हटले.

हेही वाचा

मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंकडून भाजपचा गेम; अंबरनाथ नगरपालिकेत राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष, गणितच बिघडलं