Chhattisgarh Election Result 2023: रायपूर : जयपूर : छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2023 साठी (Chhattisgarh Vidhan Sabha Election 2023) दोन टप्प्यात मतदान पार पडलं. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेस (Chhattisgarh Congress) सरकार सत्ता टिकवणार की भाजप (BJP Chhattisgarh) बाजी मारणार हे येत्या 3 डिसेंबरच्या निकालात स्पष्ट होईल. त्याआधी एक्झिट पोलचे (Chhattisgarh Exit Poll 2023) आकडे समोर येण्यास सुरुवात झाली आहे.


छत्तीसगड एक्झिट पोल एबीपी सी वोटर (Chhattisgarh exit poll ABP C Voter  2023) 



  • काँग्रेस - 41 ते 53

  • भाजप - 36 ते 48

  • इतर - 1 ते 4

  • एकूण - 90


INC- 41-53
BJP-36-48
JCC-0-0
OTH-0-4


दोन टप्प्यात मतदान (Chhattisgarh Voting)


तुलनेनं छोटं मात्र महत्वाचं असं राज्य आहे छत्तीसगड. इथल्या 90 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पडलं. पहिल्या टप्प्यात 7 नोव्हेंबर रोजी तर दुसऱ्या टप्प्यात  17 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं.


छत्तीसगड गृह लक्ष्मी योजना' (Chhattisgarh Grih Laxmi Yojana) 


गेल्यावेळी मिळालेलं बंपर यश कायम राखण्यसाठी काँग्रेसनं धाडसी निर्णय घेतले. आणि मुख्यमंत्री भूपेश बघेल (Chhattisgarh CM Bhupesh Baghel) यांच्या नेतृत्त्वातच निवडणूक लढवली. दिवाळीच्या दिवशी भुपेश बघेल यांनी जाहीर केलेली 'छत्तीसगड गृह लक्ष्मी योजना' (Chhattisgarh Grih Laxmi Yojana) महत्वाचा मुद्दा ठरु शकते.त्यानुसार जर काँग्रेस पुन्हा सत्तेत आली तर राज्यातल्या महिलांना वार्षिक 15 हजार रुपये दिले जातील.


महतारी वंदन योजना (Chhattisgarh Mahtari Dular Yojana)


उत्तरात भाजपनंही माजी मुख्यमंत्री रमण सिंहांच्या (Raman Singh) नेतृत्वात निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली. इतकंच नाही तर मध्य प्रदेशाप्रमाणेही इथेही काही खासदारांना देखील रिंगणात उतरवलं. आणि काँग्रेसच्या गृह लक्ष्मी योजनेला उत्तर देत महतारी वंदन योजना आणली. त्यात भाजप सत्तेत आलं तर विवाहित महिलांना दरवर्षी १२ हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलंय.. प्रचारही जोरदार झाला. मतदानाही जवळपास ७० टक्के झालंय. 


राज्यात पुन्हा काँग्रेसचं सरकार आल्यास आम्ही छत्तीसगड गृह लक्ष्मी योजना सुरु करु, ज्याद्वारे महिलांच्या खात्यात वार्षिक १५ हजार रुपये जमा केले जातील, असं काँग्रेसने म्हटलं आहे. 


राज्यातील विरोधी पक्ष भाजपनं त्यांची सत्ता आल्यास महतारी वंदन योजना याद्वारे विवाहित महिलांना दरवर्षी १२ हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. 


काँग्रेसचं आक्रमक धोरण 


काँग्रेस मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नेतृत्त्वात पुन्हा निवडणुकीला सामोरं जात आहे. तर, भाजपकडून देखील निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. भाजपनं काही खासदारांना देखील रिंगणात उतरवलं आहे. रमण सिंग यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसनं देखील यावेळी निवडणुकीसाठी आक्रमक धोरणं अलंबवलं आहे.


काँग्रेसने २२ आमदारांना उमेदवारी नाकारली


काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीसाठी एकूण ९० जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. शेवटच्या यादीत काँग्रेसनं ४ विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारली आहे. आतापर्यंत काँग्रेसनं एकूण २२ आमदारांना उमेदवारी नाकारली आहे. काँग्रेसचे गेल्या विधानसभा निवडणुकीत ७१ आमदार विजयी झाले होते. त्यापैकी २२ उमेदवारांचं तिकीट कापत काँग्रेसनं धाडसी पाऊल टाकलं आहे. 


संबंधित बातम्या  


Chhattisgarh ABP CVoter Opinion Poll : छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्ता राखणार की भाजप धक्का देणार? सर्वेक्षणाचा अंदाज काय?