रायपूर/भोपाळ : छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातील विधानसभा निवडणुकांमुळे दोन्ही राज्यात आता सर्वच पक्षात चढाओढ सुरु झाली आहे. आज छत्तीसगडमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपचे आगामी निवडणुकांसाठीचे संकल्पपत्र जारी केले. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसनेदेखील मध्यप्रदेशमध्ये घोषणापत्र जारी केले.
छत्तीसगड विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज भाजपने त्यांचे घोषणापत्र (संकल्प पत्र) जारी केले. भाजपचे संकल्पपत्र शेतकरी, महिला आणि तरुणांना केंद्रस्थानी ठेवून तयार केले आहे. मुख्यमंत्री रमन सिंह म्हणाले की, छत्तीसगडमध्ये फिल्मसिटी निर्माण केली जाणार आहे. 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके आणि बर्फी दिली जाईल. पत्रकार कल्याण बोर्डाची निर्मिती केली जाईल. महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी 2 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाईल.
मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी आज काँग्रेसने घोषणापत्र जारी केले. काँग्रेसने दावा केला आहे. की सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी वीजेचा दर कमी केला जाईल. तरूण बेरोजगारांना बेरोजगारी भत्ता आणि मोबाईल दिला जाईल.
छत्तीसगडमध्ये भाजपचे संकल्पपत्र, मध्यप्रदेशात काँग्रेसचे घोषणापत्र जारी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Nov 2018 06:02 PM (IST)
आज छत्तीसगडमध्ये भाजपने आगामी निवडणुकांसाठीचे संकल्पपत्र जारी केले. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसनेदेखील मध्यप्रदेशमध्ये घोषणापत्र जारी केले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -