Chandrapur Municipal Corporation Election Result 2026: चंद्रपूर महानगरपालिकेच्या (Chandrapur Election 2026 Result) गटनेता आणि महापौरपदाच्या निवडीसाठी काँग्रेसच्या अंतर्गत कुरघोड्यांना सुरुवात झाली आहे. शनिवारी रात्रीपासून दिग्गज काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी काँग्रेसच्या 14 ते 15 नगरसेवकांना अज्ञातस्थळी रवाना केले आहे. तर खासदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी देखील आपल्या समर्थक 12 ते 13 नगरसेवकांना आधी हैद्राबाद आणि त्यानंतर नागपूर जिल्ह्यात हलवलं आहे. महापौर आणि गटनेता निवडण्यासाठी काँग्रेसचे निरीक्षक चंद्रपुरात आल्यावरच हे सर्व नगरसेवक चंद्रपुरात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Continues below advertisement

Chandrapur Congress : महापौर आणि गटनेता पद मिळवण्याची दोन्ही नेत्यांमध्ये स्पर्धा

दरम्यान, पक्ष निरीक्षकांसमोर आपल्या बाजूला जास्त नगरसेवक असल्याचं दाखवण्यासाठी वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यात ही चढाओढ सुरू झाली आहे. आपल्याकडे जास्त नगरसेवक आहे, हे दाखवून पक्षनिरीक्षकांवर दबाव टाकून आपल्या पदरात महापौर आणि गटनेता पद मिळवण्याची दोन्ही नेत्यांमध्ये ही स्पर्धा सुरू झाली आहे.

Continues below advertisement

दरम्यान, आम्ही सर्व एकच आहोत. काँग्रेसचे एकूण 27 नगरसेवक आहेत, ते व्यवस्थेसाठी वेगवेगळे ठेवले गेले असले तरी आम्ही सगळे एकत्र आहोत. गटनेता एक होईल आणि काँग्रेसचा महापौर चंद्रपूर महानगरपालिकेत बसेल, यामध्ये कोणतेही दुमत नाही. सुधीर मुनगंटीवार यांनी जे वक्तव्य केलं यासगळ्या अफवा आहे. खासदाराचे किंवा आमदाराचे असो सर्व नगरसेवक आमचे सुरक्षित आहे. आम्ही सर्व काँग्रेसचे असल्याने गटनेता करताना सगळे एकत्र येऊ आणि सत्ता स्थापन करू. अशीप्रतिक्रियाकाँग्रेसनेतेविजयवडेट्टीवारयांनीदिलीय.

Vijay Wadettiwar : कोणताही चुकीचा निर्णय घेण्यास कोणताही स्कोप नाही 

आम्ही शेकापसोबत आघाडी केली होती. ते देखील आमच्यासोबत आहे आणि सत्ता स्थापन करण्यासाठी लागणारी संख्या त्याची व्यवस्था झाली आहे. भाजपकडे देखील मुनगंटीवार आणि जोरगेवार यांची माणसे वेगवेगळी आहे. तरी ते एकत्र येणारच, तसे आम्हीपण एकत्र आहोत. कोणताही चुकीचा निर्णय घेण्यास कोणताही स्कोप नाही. असेहीविजयवडेट्टीवारम्हणाले.

जो कोणी काँग्रेस पक्षासोबत निष्ठावंत आहे. सोबतच वरिष्ठ आहे. अशा अनुभवी चेहऱ्याला गटनेता करावं, अशी आमची चर्चा आहे. आमचे नगरसेवक भाजपच्या संपर्कात राहण्याचा प्रश्न उद्भवत नाही. उलट त्यांचे नगरसेवक आमच्या संपर्कात आहे. त्यांचं हवेवर तीर मारण्याचा प्रकार आहे. एकत्रित राहून काँग्रेसला सत्ता मिळवायची हे आम्हाला माहिती आहे. जनतेने काँग्रेसला सत्ता देण्याच्या हेतूने त्या ठिकाणी मतदान केलं आहे. असेहीविजयवडेट्टीवारम्हणाले.

इतरमहत्वाच्याबातम्या