चंद्रपूर : शिवसेना-भाजप युतीचा पहिला साईड इफेक्ट चंद्रपुरात दिसत आहे. कारण नाराज वरोरा-भद्रावती मतदारसंघाचे शिवसेना आमदार बाळू धानोरकर हे शिवसेना पक्षाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. बाळू धानोरकर काँग्रेसमध्ये प्रवेश करुन चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. यासंदर्भात त्यांनी 28 फेब्रुवारीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांची भेट घेतल्याचंही कळतं.




शिवसेनेच्या 12 पैकी एका मंत्र्यांनेही काम केलं नाही : बाळू धानोरकर

बाळू धानोरकर आणि हंसराज अहिर यांच्या टोकाचे मतभेद आहेत. युतीमध्ये असताना हंसराज अहिर यांनी आतापर्यंत निवडणुकीत कोणतीही मदत केली नाही, असा आरोप बाळू धानोरकर यांनी केला आहे. त्यामुळे बाळू धानोकरांनी अहिर यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.

शरद पवारांचे हात बळकट करणार, डॉ. अमोल कोल्हेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

युती झाल्याने निवडणूक लढवणार नसल्याचं बाळू धानोरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितल्याचं कळतं. त्यामुळे काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवून हंसराज अहिर यांना आव्हान देण्याची इच्छा धानोरकर यांनी बोलून दाखवली.

चंद्रपूर लोकसभा मतदार संघ : युती न झाल्यास हंसराज अहिरांना शिवसेनेकडून तगडी टक्कर

काही दिवसांपूर्वीच स्टार प्रचारक अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता बाळू धानोरकर हे देखील शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचं कळतं.

EXCLUSIVE | शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांची विशेष मुलाखत | चंद्रपूर | एबीपी माझा