सोलापूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कधीकाळी भाजप अध्यक्षांचा उल्लेख अफजलखान होता, त्यावर आज महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या रुपाने पहिल्यांदाच कोणीतरी प्रतिक्रिया दिली आहे. युती झाली आहे, मात्र काही शब्द जपून वापरायचे असतात, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. सोलापूरमधील पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते.


2014 मध्ये शिवसेना भाजपची 25 वर्षांची युती तुटल्यानंतर तुळजापूरमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांची तुलना अफजल खानाच्या फौजेसोबत केली होती. यानंतर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने वारंवार भाजप, अमित शाह आणि नरेंद्र मोदींवर जोरदार शाब्दिक प्रहार केले होते. मात्र 30 मार्च रोजी भाजप अध्यक्ष अमित शाह उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गांधीनगरमध्ये हजेरी लावली होती.

याविषयी विचारलं असता ते म्हणाले की, "त्या-त्या वेळेला मतभेद होऊन काही शब्द उच्चारले जातात. ते फार जपून वापरायचे असतात. पण असे शब्द कुटुंबातही वापरले जातात. नवरा-बायको भांडतानाही एकमेकांना बोलतात. पुन्हा दुसऱ्या दिवशी चहा एकत्र पितात. मला वाटतं त्या-त्या घटनांमध्ये बोललं गेलं असेल. माणूस तो चांगला, जो नंतर बोलतो की, हे चुकलं आणि आता आपण बरोबर काम करु."

VIDEO | शब्द जपून वापरायला हवे होते : चंद्रकांत पाटील


संबंधित बातम्या

अमित शाहांचा गांधीनगरमधून उमेदवारी अर्ज दाखल, उद्धव ठाकरेंची हजेरी

विरोधकांचा नेता कोण, उद्धव ठाकरे यांचा सवाल

LIVE : अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज दाखल