पुरी : मोदी सरकारच्या उज्ज्वला योजनेची पोलखोल भाजपच्याच एका नेत्याच्या ट्वीटमुळे झाली आहे. भाजप नेते संबित पात्रांनी ओदिशाच्या पुरीमधील आपला एक व्हिडीओ ट्विटवर शेअर केला आहे. या व्हिडीओत संबित पात्रा एका गरीब कुटुंबाच्या घरी जेवताना दिसत आहेत. मात्र त्या घरातील महिला हे जेवण चुलीवर बनवत असल्याचं व्हिडीओत दिसत आहेत.
संबित पात्रा यांनी गरीब महिलेच्या घरी जेवताना आणि त्यांच्या घरातील सदस्यांना जेवण भरवतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीयोत महिला मातीच्या चुलीवर जेवत बनवत आहे, हे स्पष्ट दिसत आहे. मात्र मोठा गाजावाजा करुन भाजपने उज्ज्वला योजनेचा प्रचार आणि प्रसार केला होता. तसेच ही योजनी किती लाभदायक आणि यशस्वी झाली असल्याचा डंका पिटला होता. मात्र या योजनेचा लाभ नक्की कोणाला मिळाला, असा प्रश्न या व्हिडीओनंतर निर्माण होत आहे.
संबित पात्रांचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर काँग्रेसने उज्ज्वला योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी उज्ज्वला योजनेचं यश आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल. प्रियांका चतुर्वेदी यांनी म्हटलं की, "ज्या धर्मेंद्र प्रधान यांना उज्ज्वला योजनेचं श्रेय दिलं जातं ते ओदिशाचे नाहीत का?"
संबित पात्रा यांनी व्हिडीओ शेअर करत लिहिलं की, "हे माझं कुटुंब आहे. आईने जेवण बनवलं आणि भरवलं. मी माझ्या हाताने यांना जेवण भरवलं आहे आणि यांची सेवा देवपूजा आहे."
लोकसभा निवडणुकीसाठी ओदिशामध्ये चार टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर देशात सात टप्प्या मतदान पार पडणार आहे. निवडणुकीचा अंतिम निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहे.
व्हिडीओ : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची तोंडी परीक्षा | तोंडी परीक्षा