जळगाव :  'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी बारामतीची जागा भाजपने जिंकली तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल, असं खळबळजनक विधान केलं आहे. त्यावर बोलताना राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना बारामतीचा पराभव समोर दिसू लागल्यामुळेच पवार आता अशी विधान करीत असल्याची टीका केली आहे.

बारामतीमधून शरद पवारांची कन्या आणि राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपच्या नेत्यांकडून बारामतीची जागा जिंकण्याबाबतचा विश्वास व्यक्त केला जात होता. त्याबद्दल बोलताना पवारांनी 'जर बारामती भाजपनं जिंकली तर लोकांचा निवडणुकांवरचा विश्वास उडेल', असं खळबळजनक विधान केलं आहे. यावर महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी सडकून टीका केली.

VIDEO | शरद पवारांचा तो दावा पराभवाचा अंदाज आला म्हणूनच : चंद्राकांत पाटील | जळगाव | एबीपी माझा



शरद पवारांनी अशी विधान करण्यापेक्षा अगोदर त्यांनी आपल्या पराभवाची कारणे लिहायला घेतली पाहिजे असल्याचंही चंद्रकांत पाटील म्हणाले. याही परिस्तिथीत राष्ट्रवादी पक्षाचे खासदार निवडूण आल्यास ईव्हीएम घोटाळा नाही पण आमचे खासदार निवडूण आल्यास ईव्हीएम घोटाळा याला काय म्हणायचे? असा सवालही पाटलांनी उपस्थित केला.

ईव्हीएम आणलं कोणी तर काँग्रेसनेच आणले आहे. हा देश कायद्याने चालतो, निवडणूक आयुक्त स्वायत्त आहे. त्याला केवळ न्यायालयच सांगू शकत. न्यायालयाने त्यांना सांगावं ईव्हीएम बंद करावं आणि लोकांनी हात वरती करून मतदान करावं आमचं काही एक म्हणणं नाही. देशाची सिस्टीम नाकारण्याचा उद्योग काँग्रेसने चालविला आहे. ईव्हीएमचा घोटाळा शरद पवार यांनी म्हणणे म्हणजे त्यांना पराभवाची चाहूल लागल्या सारखं आहे.

VIDEO | बारामतीची जागा भाजपने जिंकल्यास लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल : पवार | एबीपी माझा



संबंधित बातम्या

बारामतीची जागा भाजपने जिंकल्यास लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल : पवार

कुटुंबावर बारामतीच्या पराभवाचं खापर नको म्हणुन पवारांचं ईव्हीएमकडे बोट : विनोद तावडे

राज ठाकरेंच्या सभांचा भाजपला फायदा झाला, शिक्षणमंत्री विनोद तावडेंचा दावा