मुंबई : मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकाम आणि गोदामामुळेच मुंबईतल्या माटुंग्यामधील 'बिग बझार'मध्ये आग लागल्याचं समोर आलं आहे. महापालिकेने दोन वेळा नोटीस पाठवूनही बिग बझारने दुर्लक्ष केल्याचं सांगितलं जात आहे.
बिग बझारमध्ये सोमवार 29 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास आगीचा भडका उडाला होता. सुदैवाने वेळीच सर्व ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं.
'बिग बझार' आणि सोबतच्या 'पाम हाऊस' इमारत यांच्यात सुमारे 20 फुटांपर्यंत असलेल्या भिंतीला लागून मालकाने बेकायदेशीरपणे स्टॉल्स आणि गोडाऊन उभारल्याचंही समोर आलं आहे. यामुळे अग्निशमनल दलाला आग विझवण्यात अडथळे निर्माण होऊन तब्बल सहा तासांनंतरही वारंवार आगीचा भडका उडत होता.
न्यायालयात प्रकरण असल्यामुळे कारवाई केली नसल्याचं पालिका प्रशासनाकडून सांगितलं जात आहे. याबाबत 4 जुलै रोजी सिटी सिव्हिक कोर्टमध्ये सुनावणी होणार होती.
'बिग बझार'मधील बेकायदा बांधकामप्रकरणी एमएमआरटीपी अॅक्टखाली 24 जुलै 2010 रोजीही पालिकेने नोटीस पाठवली होती. यानंतर संबंधित मालकाने पालिकेच्या नोटीसविरोधात सिटी सिव्हिक कोर्टात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या निर्देशानुसार पालिकेने पुन्हा 18 मे 2011 रोजी पुन्हा नोटीस पाठवली होती. यानंतर सध्या सिटी सिव्हिक कोर्टमध्ये प्रकरण गेल्यानंतर 4 जुलै 2019 रोजी सुनावणीही होणार होती.
बेकायदा बांधकाम आणि गोदामामुळेच माटुंग्यातील 'बिग बझार'मध्ये आग
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 May 2019 11:33 AM (IST)
'बिग बझार' आणि सोबतच्या 'पाम हाऊस' इमारत यांच्यात सुमारे 20 फुटांपर्यंत असलेल्या भिंतीला लागून मालकाने बेकायदेशीरपणे स्टॉल्स आणि गोडाऊन उभारल्याचंही समोर आलं आहे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -