Chandivali Vidhan Sabha constituency: चांदिवली विधानसभा मतदारसंघात यंदा पुन्हा एकदा चुरशीची लढत पाहायला मिळाली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत चांदिवली मतदारसंघात (Chandivali Vidhan Sabha) शिवसेनेच्या दिलीप लांडे (Dilip Lande) यांनी काँग्रेसच्या नसीम खान यांचा निसटता पराभव केला होता. त्यापूर्वी 2009 आणि 2014 मध्ये या मतदारसंघात नसीम खान विजयी झाले होते. त्यामुळे चांदिवली मतदारसंघ हा नसीम खान यांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, 2019 मध्ये दिलीप लांडे यांनी त्यांना अवघ्या 409 मतांनी पराभवाचा धक्का दिला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत नसीम खान हा हिशेब चुकता करणार का, याकडे लक्ष होतं. पण यंदाही त्यांना हा हिशोब चुकता करता आलेला नाहीये. कारण यंदाच्याही विधानसभा निवडणुकांमध्ये दिलीप लांडेंचा विजय झाला आहे.


चांदिवली मतदारसंघात 4 लाख 46 हजार 767 मतदार आहेत. 2009 ते 2014 च्या काळात या मतदारसंघात मनसेची चांगली ताकद होती. 2014 च्या निवडणुकीत मनसेच्या उमेदवाराने चांदिवलीत तब्बल 28 हजार मतं मिळवली होती. तर 2019 मध्ये मनसेच्या उमेदवाराला तब्बल 7 हजार मतं मिळाली होती. यंदा चांदिवलीतून मनसेने महेंद्र भानुशाल यांना रिंगणात होते. ते या निवडणुकीत किती मतं मिळवणार, यावर चांदिवली विधानसभेचा निकाल बदलण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. पण आता या मतदारसंघातून दिलीप लांडे यांनी विजय संपादन केला आहे. 


ही बातमी वाचा : 


Dahisar Vidhan Sabha constituency: दहिसर विधानसभा मतदारसंघात विनोद घोसाळकर पराभूत, भाजपच्या मनीषा चौधरी विजयी