मुंबई : मुंबई शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी काल 75 लाख रुपयांची संशयित रक्कम जप्त करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाने केलेल्या कारवाईत ही रक्कम ताब्यात घेण्यात आली.
मुंबईतील एस. व्ही. पी. रोडवरील गोल देऊळ या परिसरात हुन्दाई i20 कारची तपासणी करण्यात आली होती. गाडीत असलेल्या प्रदीप निसार, शांतीलाल निसार आणि महेश गाला हे तिघे जण होते. त्यांच्याकडे 10 लाख रुपयांची रक्कम आढळून आली. मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील स्थिर तपासणी पथकाने ही कारवाई केली.
भायखळा परिसरात बी. जे. रोडवर तांबीट नाका परिसरात स्थिर तपासणी पथकाने ओला ॲसेन्ट गाडीची तपासणी केली असता, त्यात 49 लाख 98 हजार 500 रुपयांची रोकड आढळून आली. भायखळ्यातील ई. एम. पाटणवाला मार्गावर राणी बागेजवळ इको स्पोर्ट्स फोर्ड कारची तपासणी केली असता, त्यात 15 लाख रुपये आढळून आले.
या तिन्ही प्रकरणांबाबत आयकर विभागाला कळवण्यात आलं असून आयकर विभागाचे उपआयुक्त अधिक चौकशी करत आहेत, अशी माहिती मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बन्सी गवळी यांनी दिली.
दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी मुंबईत 75 लाखांची संशयित रोकड जप्त
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Apr 2019 12:49 PM (IST)
निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाने केलेल्या कारवाईत मुंबईत तीन वेगवेगळ्या ठिकाणी 75 लाख रुपयांची संशयित रक्कम ताब्यात घेण्यात आली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -