BMC Election: मुंबई मनपा निवडणुकीत प्रभाग क्रमांक 173 मधील भाजप उमेदवार शिल्पा केळुसकर यांनी कलर झेराॅक्स काढलेला एबी फाॅर्म निवडणूक आयोगाने अर्ज ग्राह्य धरल्याने भाजपची मोठी गोची झाली होती. शेवटच्या क्षणी उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंडखोरी करत अर्ज कायम ठेवला आहे. आता भाजपच्या बंडखोर उमेदवार शिल्पा केळूसकर यांच्या विरोधात अखेर सायन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचा डुब्लिकेट एबी फाॅर्म दाखल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी पत्र पाठवत कारवाई करण्याच्या संदर्भात पत्र दिलं होतं. काल (2 जानेवारी) रात्री केळुसकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा यासाठी भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी रात्री उशीरापर्यंत ठिय्या आंदोलन केलं होतं. साटम यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहित फॉर्म रद्द करण्याची मागणी केली होती. 

Continues below advertisement

एबी फॉर्म देण्यासाठी शेवटपर्यंत ताटकळत ठेवलं

दुसरीकडे, महायुतीे महानगरपालिका निवडणुकींसाठी युती करण्यावरून तसेच उमेदवारांना एबी फॉर्म देण्यासाठी शेवटपर्यंत ताटकळत ठेवल्याने झालेलं रणकंदन अवघ्या महाराष्ट्राने पाहिला. यामुळे महायुतीमध्ये उमेदवारीवरून सुरू असलेला संघर्ष रस्त्यावर आला. काहींनी छाती बडवून घेतली, काहींना अश्रू अनावर झाले, तर काहींनी एबी फॉर्म असलेल्या गाड्यांचा सुद्धा पाठलाग केला अशी अभूतपूर्व परिस्थिती झाली. 

थेट बनावट एबी फॉर्म जोडला

मुंबईतील प्रभाग क्रमांक 173 मधील शिल्पा केळुसकर यांनी उमेदवारी न मिळाल्याने थेट बनावट एबी फॉर्म (कलर झेराॅक्स) निवडणूक आयोगाकडे उमेदवारी अर्ज सादर केला. इतकेच नव्हे तर हा अर्ज सुद्धा वैध ठरवण्यात आला. त्यामुळे भाजपची डोकेदुखी चांगलीच वाढली. जागा वाटपामध्ये प्रभाग क्रमांक 173 ची जागा शिवसेना शिंदे गटाला गेली. त्यामुळे या ठिकाणी माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्या पत्नी पूजा कांबळे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. दुसरीकडे, बनावट फॉर्म दिल्याचे लक्षात येताच भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. अमित साटम यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. शिल्पा केळुस्कर यांना भाजपने आधी एबी फॉर्म दिला होता. पण नंतर तो काढून घेतला. मात्र, शिल्पा केळुसकर यांनी डुप्लिकेट एबी फॉर्म तयार केला आणि तो अर्जासोबत जोडल्याचं समोर आलं.

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या