Chhattisgarh Naxal: छत्तीसगडमधील सुकमा आणि बिजापूर जिल्ह्याच्या सीमेवरील जंगलात माओवादी आणि सुरक्षा दलांसोबतचे चकमक (Chhattisgarh Naxal) झाल्याचीमाहितीसमोरआलीआहे. याचकमकीमध्ये आतापर्यंत एकूण 14 माओवादी मारले गेल्याचीमाहितीआहे. दरम्यान, घटनास्थळावरून सुरक्षा दलांनी (Security Forces) एके 47 आणि एसएलआर रायफल्सह मोठ्या प्रमाणावर शस्त्रही जप्त केले आहे. परिणामीसुरक्षा दलानेमाओवाद्यांच्याविरोधातसुरुकेलेल्यानक्षलविरोधीमोहिमेलामोठंयशआलंआहे. सध्यायापरिसरातपोलिसांकडूनसर्चऑपरेशनदेखीलराबवलंजातंय. त्यांनतरयासंबंधितअधिकृतमाहितीकळूशकणारआहे.
Chhattisgarh Naxal : अद्याप माओवाद्यांमध्ये चकमक सुरू; आतापर्यंत 14 माओवाद्यांचे मृतदेह ताब्यात
मिळालेल्यामाहितीनुसार, सुकमा आणि विजापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात मोठ्या प्रमाणावर सशस्त्र माओवादी असल्याची गोपनीय माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर त्या भागात सर्च ऑपरेशन राबवण्यात आले होते. विजापूरच्या जंगलात आज पहाटे पाच वाजतापासून सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. तर सुकमा जिल्ह्यातील जंगलात सकाळी आठ वाजतापासून चकमकीला सुरुवात झाली. दोन्ही ठिकाणी सर्च ऑपरेशनमध्ये आतापर्यंत 14 माओवाद्यांचे मृतदेह आढळले आहे. तरअद्याप कोंबिंग ऑपरेशन सुरू असून अजूनही माओवाद्यांकडून काही काही वेळानंतर फायरिंग केली जात असल्याचीमाहितीआहे. या घटनेत छत्तीसगडमधील कोंटा येथील एएसपी आकाश राव गिरीपुंजे या मराठी अधिकाऱ्यावर हल्ला करत त्यांच्या जीव घेणारे माओवादी आणि त्यांचा कमांडरही मारला गेल्याची माहिती आहे.
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 25 विद्यार्थ्यांना मिळाला थेट रोजगार
नक्षलवादामुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांच्या सामाजिक-आर्थिक सक्षमीकरणासाठी गडचिरोली (Gadchiroli) जिल्हा प्रशासनाने नववर्षाच्या सुरुवातीलाच एक महत्त्वपूर्ण निर्णय अंमलात आणला. जिल्हाधिकारी (collector) अविश्यांत पंडा यांच्या पुढाकारातून नक्षलपीडित कुटुंबातील 29 तरुणांना शासनसेवेत सामावून घेण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत या सर्व कुटुंबातील सदस्यांना शिपाई पदावर सरकारी नोकरीच्या (Job) नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
गडचिरोलीतील क्रातीवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राबविण्यात आलेल्या ट्रॅक्टर सर्विस मेकॅनिक या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमातून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 25 विद्यार्थ्यांना नववर्षी नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रम दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडला. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील स्थानिक युवकांना विकास प्रक्रियेचा थेट लाभ मिळावा, यासाठी कौशल्यविकास विभाग वेगाने काम करीत असल्याचेही त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
