सोलापूर: राज्यात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या घडामोडीच्या अनुषंगाने मोठा संताप राजकीय नेते व्यक्त करताना दिसत आहेत. अशातच काही नगरपालिकांमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये भाजपची संख्या जास्त आहे. यादरम्यान सोलापुरात राजकीय (Mahangarpalika Election 2026) वादातून झालेल्या मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्याप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविका आणि प्रभाग 2 च्या उमेदवारासह 15 जणावर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यावर बोलताना काँग्रेस नेत्या आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे. भाजपला सर्वत्र बिनविरोध निवडणुका पाहिजे होत्या. सोलापुरातील RO अजूनही उमेदवार याद्या देत नाहीत. शंभर टक्के भाजपने खिडकीतून एबी फॉर्म दिले आहेत. अर्ज माघार घेण्यासाठी भाजपकडून उमेदवार फरपटत नेण्यात आले. कालचा जो मर्डर झाला, बीजेपीकडून सांगतील, की तो कौटुंबिक वाद आहे, असंही प्रणिती शिंदेंनी म्हटलं आहे.(Solapur Crime News)
Solapur Crime: बिनविरोध होण्यासाठी मर्डर झाला
प्रशासनातले अधिकार महाविकास आघाडी किंवा इतरांना साथ देणार नसतील तर कुणाकडे बघणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. सीसीटीव्ही आणि इतर साहित्य तपासून त्याच्यामागे कोण आहे ते तपासलं पाहिजे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना धमक्या येतात, बंडखोर उमेदवारांनर पण दबाव आहे. पालकमंत्र्यांनी त्यांच्या पदाचा रिस्पेक्ट असला पाहिजे, एवढ्या खालच्या पातळीवरून निवडणुका लढतात. बिनविरोध होण्यासाठी मर्डर झाला. भाजपकडे उमेदवार नाही ही लाजिरवाणी बाब आहे. त्यांच्याकडे उमेदवार नाही त्यामुळे महाविकास आघाडीतील उमेदवार घेत आहेत. प्रशासनावर दबाव असेल किंवा माघार घेण्याच्या दिवशी झालेल्या नाटक असेल. यातून भाजप एक्सपोज झाला आहे, असंही प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.
Solapur Crime: भाजपची लोक फक्त पैसे मिळतात म्हणून....
भाजपच्या एबी फॉर्म प्रकरणी आम्ही पिटीशन (Petition) न्यायालय दाखल करतोय. महाविकास आघाडीचा सोलापुरात पाच तारखेला प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. काँग्रेस सोलापुरात हिंमतीने लढत आहे. नक्कीच महाविकास आघाडीचा विजय होणार आहे.भाजप रक्तावर राजकारण करत आहे. भाजपची लोक फक्त पैसे मिळतात म्हणून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढतात. त्यांना खोके मिळतात म्हणून ते लढतात. भाजपचे दोन सिनियर आमदार आहेत, त्यांना पालकमंत्री, मंत्री पद मिळालं आहे. त्यांना डावललं जात असेल तर ते दुर्दैवी आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
Solapur Crime: सोलापुरात अमित ठाकरेंचा राईट हँड बाळासाहेब सरवदेंना संपवलं
सोलापुरात राजकीय (Mahangarpalika Election 2026) वादातून झालेल्या मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्याप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविका आणि प्रभाग 2 च्या उमेदवारासह 15 जणावर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. भाजपच्या माजी नगरसेविका, प्रभाग 2 मधील उमेदवार शालन शिंदे, तीचा पती शंकर शिंदे यांच्यासह 15 जणावर हत्येचा गुन्हा पोलिसांनी नोंद केलाय. काल (शुक्रवारी) उमेदवारी अर्ज माघार घेण्यावरून भाजप उमेदवार शालन शिंदे आणि भाजपच्या बंडखोर रेखा सरवदे यांच्या कुटुंबियांत वाद झाला होता.
दरम्यान, भाजप उमेदवार शालन शंकर शिंदे यांनी मयत बाळासाहेब सरवदे याच्या डोळ्यात चटणी टाकून इतर आरोपीनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आलंय. मयत बाळासाहेब याचा भाऊ बाजीराव पांडुरंग सरवदे याच्या फिर्यादीवरून एकूण 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीएनएस कलम 103, 109, 189 (1),(2), 190, 191(2),(3), 49, 352, 351(2), शस्त्र अधिनियम 4, 25 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.