काँग्रेस सरकारसोबत युती करण्याच्या निर्णयाबाबत मायावती म्हणाल्या की, "आम्ही उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षासोबत युती केली आहे. आमच्या दोन समविचारी पक्षांची ही युती उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी पुरेशी आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात समविचारी विरोधी पक्षांनी एकत्र निवडणूक लढवण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. त्यामुळेच उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसने महाआघाडीत यावे यासाठी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी प्रयत्न केले होते. परंतु आता मायावतींच्या निर्णयानंतर महाआघाडीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
दरम्यान, दिल्लीत काँग्रेसने आम आदमी पक्षाला सोबत न घेण्याचा निर्णय घेतला आहे. आज मायावतींनी काँग्रेससोबत न जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मतांचं विभाजन होवून भाजपला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
व्हिडीओ पाहा