2022 Brihanmumbai Municipal Corporation election : शिवसेना, भाजपा,काँग्रेस ,राष्ट्रवादी आणि मनसे यांच्यात संघर्ष सुरू असताना मुंबईकरांना नवा पर्याय देण्याच्या जोरदार हालचाली आम आदमी पक्षाने सुरू केल्या आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने दिल्ली, पंजाबमध्ये सत्ता काबिज केल्यानंतर आता मुंबईत पक्षाचा विस्तार करण्यासाठी पावले उचलली आहेत. मुंबई महापालिकेत होणाऱ्या निवडणूकीत मुसंडी मारण्यासाठी ‘आप’ ने तयारी सुरु केली आहे.
दिल्ली पंजाब याठिकाणी आपने करिष्मा दाखवत सत्ता स्थापन केली. मात्र काही राज्यात आपला अपयश आले. गेल्या 2019 मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत आप स्वबळावर लढला होता. मात्र त्यांच्या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही. आता होवू घातलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष एकमेकांवर कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्यांचे आरोप करू लागले आहेत. हे दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. तसेच राष्ट्रवादी मनसे काँग्रेस आणि इतर पक्ष देखील आपल्या राजकारणात व्यस्त आहेत. मुंबईत सुरु असलेल्या राजकीय गदारोळात आपने आपली स्पेस निर्माण करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष गेली 25 वर्षे सत्तेत एकत्र होते. 2019 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर युती तुटली. युती तुटल्यानंतर दोन्ही राजकीय पक्षांनी एकमेकांवर कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्यांचे आरोप सुरू केले आहेत, तसेच सत्ता मिळवण्यासाठी विविध प्रयत्न ते करतायत मात्र मूळ विकासाच्या मुद्द्यावर आणि समस्यांवर ते बोलत नाहीत. त्यामुळे मुंबईकर जनतेच्या अनेक समस्या आणि मुंबईचा विकास याकडे आपने लक्ष घातले आहे . आपने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत आप मुसंडी मारते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
संबंधित बातम्या :
- Shivsena : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून हालचाली, लोकसभेत पराभूत झालेल्या चार खासदाराची नावं चर्चेत
- Rajya Sabha Election : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी घोडेबाजार सुरु करण्याची विरोधकांची ईर्षा : संजय राऊत
- Anil Parab : राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजेंना शिवसेनेची मदत मिळणार नाही? काय म्हणाले मंत्री अनिल परब?