मुंबई : एकीकडे बोगस मतदानाची तक्रार आल्यानंतर त्यावर कारवाई करू असा दावा निवडणूक आयोगाकडून करण्यात येत आहे. त्याचवेळी मुंबईतील विविध ठिकाणी मात्र बोगस मतदारांचा सुळसुळाट सुरू आहे. गोरेगावातही असाच प्रकार समोर आला. मूळ मतदार मतदानासाठी गेल्यानंतर समजलं की त्याच्या नावाने आधीच मतदान झालं आहे. गोराईमध्येही असा प्रकार समोर आला आहे.

Continues below advertisement

मुंबईच्या पश्चिम उपनगरात मतदान प्रक्रियेत सावळा गोंधळ पाहायला मिळत आहे. पश्चिम उपनगरात मोठ्या प्रमाणात दुसऱ्याच्या नावाने बोगस मतदान झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

गोरेगाव आरे कॉलनी मयूर नगर परिसरात अली अन्सारी नावाच्या व्यक्तीचा जागावर दुसऱ्याने मतदान केलाची धक्कादायक घटना समोर आली. अली अन्सारी जेव्हा मतदान करायला गेला तर त्याच्या नावावर मतदान दुसऱ्यांनी केलाचं समोर आलं आहे. दुसरीकडे बोरिवली गोराई परिसरात देखील एकाच्या नावावर दुसऱ्याने मतदान केल्याच्या घटना घडली. 

Continues below advertisement

भगवा गार्ड- भाजपची वादावादी

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान दुबार मतदारांना शोधण्यासाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं मतदार केंद्राबाहेर आपले कार्यकर्ते तैनात केले होते. भगवा गार्ड, असं लिहिलेले टी-शर्ट घालून हे कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेर दिसत होते. यापैकी काही कार्यकर्त्यांची भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांशी वादावादी झाल्याचे प्रकार घडले.

मुंबईच्या बोरिवलीतील प्रभाग क्रमांक 10मध्ये भगवा गार्ड आणि पोलिसांमध्ये जोरदार गोंधळ झाला. भगवा गार्ड बोगस मतदारांचा शोध घेत होते. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि पोलीस ठाण्यात नेलं. 

चेंबूरमध्ये गोंधळ 

मुंबईतील चेंबूरमधील प्रभाग क्रमांक 153 मध्ये गोंधळ झाल्याचं दिसून आलं. शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रात्री मतदान केंद्रात प्रवेश केल्याने गोंधळ झाला. यावेळी बोगस आयडी घेऊन जाणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलं. 

शिंदे गटाचे उपविभाग संघटक रवींद्र महाडिक, लक्ष्मण पांढरे आणि आमदार तुकाराम काते यांचा मुलगा तुषार काते रात्री साडे बारा वाजता मतदान केंद्रावर गेल्याने गोंधळ झाला. 'शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी बनावट ओळखपत्र घेऊन मतदान केंद्रात गेलेच कसे?' असा प्रश्न ठाकरे गटाकडून विचारण्यात आला. 

 निवडणूक आयोगाचा इशारा

एकीकडे मुंबईमध्ये बोगस मतदान सुरूच असताना निवडणूक आयोगाने मात्र इशारा दिला आहे. बोगस मतदानाची तक्रार आल्यानंतर त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं आयोगाने स्पष्ट केलं.

ही बातमी वाचा: