Chandrapur Election 2026 : चंद्रपूर महापालिकेसाठी तब्बल आठ वर्षानंतर मतदानाची रणधुमाळी होत आहे. मतदानाला सकाळपासून संमिश्र प्रतिसाद आहे. अशातच शहरातील बंगाली कॅम्प परिसरात काल (14 जानेवारी) रात्री भाजप उमेदवार रॉबिन विश्वास आणि अपक्ष असलेले भाजप बंडखोर उमेदवार अजय सरकार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ मारामारीची घटना घडलीय. अजय सरकार यांनी रॉबिन विश्वास समर्थक असलेल्या अनु हाजरा या महिलेला मारहाण आणि विनयभंग केल्याचा आरोप केलाय. तर रॉबिन विश्वास यांनी अजय सरकार समर्थक असलेल्या ज्योती सरकार यांचा विनयभंग आणि मारहाण केल्याचा आरोप केलाय.
Chandrapur Crime: अजय सरकार आणि रॉबिन विश्वा दोन्ही उमेदवारांवर गुन्हा दाखल
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी अजय सरकार आणि रॉबिन विश्वास या दोघांवरही विनयभंग, मारहाण करणे आणि शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आज पहाटे दोन्ही पक्षांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अजय सरकार आणि रॉबिन विश्वास यांच्यात बंगाली कॅम्प प्रभागातून एकमेकांविरोधात निवडणूक लढवत आहेत. अशातच निकालापूर्वी चंद्रपुरातील राजकारण तापलं आहे.
Chandrapur Election 2026 : मतदानादरम्यान शिंदे गट आणि भाजप बंडखोर उमेदवारांच्या समर्थकांत राडा
चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक मतदानादरम्यान शहरातील नेहरू शाळा मतदान केंद्राच्या परिसरात शिवसेना शिंदे गट आणि भाजप बंडखोर उमेदवारांच्या समर्थकांत मतदारांना प्रलोभनावरून राडा झाल्याचे समोर आलं आहे. दरम्यान जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आहे. यावेळी दोन्ही गटांने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत गोंधळ घातलाय. याठिकाणी शिवसेना शिंदे गटातर्फे इसमत हुसेन तर भाजप बंडखोर उमेदवार दीपा कासट मैदानात आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप केले आहेत. सध्या या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Congress on EVM: एवढ्या ईव्हीएम कशा काय बिघडत आहेत? काँग्रेस नेते नितीन राऊत यांचा सवाल
नागपुरात मोठ्या प्रमाणावर EVM मध्ये बिघाड होत असल्याबद्दल काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त करतानाच सर्व प्रकाराबद्दल संशय व्यक्त केला आहे. उत्तर नागपूर मधील अनेक मतदान केंद्रात सकाळपासून ईव्हीएम मध्ये बिघाड होत असून काही मतदान केंद्रांमध्ये तर तीन-तीन वेळेला ईव्हीएम मध्ये बिघाड झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर ते मशीन जुनी असल्याचा कारण सांगतात अशा जुन्या मशीन्स निवडणुकीसाठी वापरल्यास कशाला असा सवाल ही नितीन राऊत यांनी उपस्थित केला आहे सत्ताधारी आणि निवडणूक आयोग यांच्यामध्ये साटे-लोटे असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
आणखी वाचा