मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह येत्या 26 सप्टेंबरला पुन्हा मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यावेळी युतीच्या जागा वाटपाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.


भाजपने शिवसेनेला 120 जागांची ऑफर दिली आहे. मात्र शिवसेनेला भाजपची ही ऑफर मान्य नाही. शिवसेना आणखी 20 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात जागा वाटपाचा सूवर्णमध्य साधून नवीन फॉर्म्युला समोर येऊ शकतो.


अमित शाह रविवारी (22 सप्टेंबरला) मुंबई दौऱ्यावर होते. मात्र त्यावेळी पक्ष संघटनेचे आणि खासगी कार्यक्रमांसाठी ते मुंबईत आले होते. त्यामुळे युतीच्या जागावाटपासंदर्भात कोणतीही चर्चा होऊ शकली नाही.


26 सप्टेंबरला अमित शाह यांचा पूर्वनियोजित दौरा आहे. त्यामुळे पुढील तीन-चार दिवसांत युतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होणार असून त्यात सहमती झाल्यास अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये जागावाटपाचा अंतिम निर्णय होऊन युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.


संबंधित बातम्या




VIDEO । राज्यात भाजपचीच सत्ता येणार, एबीपी माझा आणि सी व्होटरच्या सर्व्हेचा अंदाज | भाग 1



VIDEO | स्वतंत्र लढल्यास भाजप 144, सेना 39, महायुती झाल्यास 205 जागा; एबीपी माझा आणि सी व्होटरच्या सर्व्हेचा अंदाज | भाग 2