सिंधुदुर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर भाजपने शिवसेनेची धाकधूक वाढवली आहे. भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आणि कोकणचे सुपुत्र आमदार आशिष शेलार यांनी नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणेंच्या उमेदवारीचे समर्थन केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यासोबतच शिवसेनेच्या गोटात चर्चांना उधाण आलं आहे.


कोकणातील निवडणुकीत उमेदवार उतरवून राणेंनी आपला स्वाभिमान जपला, असं म्हणत आशिष शेलार यांनी ट्विटरवरुन राणेंचे कौतुक केलं आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे शेलारांनी एका दगडात दोन पक्षी साधल्याचं म्हटलं जात आहे.

VIDEO | भाजपला अंबानीचं सरकार म्हणणाऱ्यांनाच अंबानी हवे, आशिष शेलार यांचा काँग्रेसला टोला



'मालवणमध्ये येतेय सत्याला शब्दांची धार! नारायणस्त्राचे कुणाकुणावर प्रहार? कोकणी माणसाने उमेदवार उतरवून जपला आपला "स्वाभिमान" इंजिन भाड्याने देऊन एका पक्षाने विकला आपला अभिमान! आत्मचरित्र स्वाभिमानाचे वाचावे? की विकावू व्हिडीओ बघत बसावे? तुमचे तुम्हीच ठरवा' असं ट्वीट आशिष शेलारांनी केलं आहे.


नारायण राणेंच्या आत्मचरित्राबाबत आशिष शेलार यांनाही उत्सुकता असल्याचं दिसत आहे. #ChowkidarकेSideEffects या हॅशटॅगसह आशिष शेलार गेल्या काही दिवसांपासून मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्यावर निशाणा साधत आहे.