एझोल :  ईशान्येतील सेव्हन-सिस्टर्समधील महत्वाचे असलेल्या मिझोरम विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. मिझो नॅशनल फ्रंटला (MNF) 26 जांगासह स्पष्ट बहुमत मिळालं आहे. काँग्रेसला 5 जागांवर आणि भाजपवला एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे. तर 8 अपक्ष उमेदवार याठिकाणी निवडून आले आहेत.  तीन मोठ्या राज्यात मोठी आघाडी मिळवणाऱ्या काँग्रेसने आपल्या हातून मिझोरमची सत्ता गमावली आहे.


सलग 13 वर्ष मिझोरमचे मुख्यमंत्री असलेल्या पी. लालथनहवला यांना दोन्ही ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला आहे. चंफाई साउथ आणि सेरछिप या दोन्ही मतदारसंघातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 


राज्याचे 3 टर्म मुख्यमंत्री असलेले ललथनहवला यांना चंपाई साऊथ मतदारसंघातून लालनुंतउआंगा यांनी मात दिली. मिझोरममध्ये मागील दहा वर्षांपासून काँग्रेसची सत्ता होती.  पु लाल थनहवला हे गेल्या दहा वर्षांपासून मुख्यमंत्रिपदाची कमान सांभाळून होते.


राज्यात यावेळी काँग्रेस आणि विरोधी मिझो नॅशनल फ्रंटमध्ये मुख्य लढत होती. 2013 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक 34 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली होती. काँग्रेसचा मुख्य प्रतिस्पर्धी मिझो नॅशनल फ्रंटने 5 जागांवर तर मिझोरम पीपल्स फ्रंटने एका जागेवर विजय मिळवला होता. या निवडणुकीत भाजपला खातेही उघडता आले नव्हते. यावेळीही भाजपला मिझोरममध्ये विशेष यश मिळवता आलेले नाही. भाजप केवळ एकाच जागेवर आघाडीवर आहे.


मिझोरममधील ही  12 वी विधानसभा  निवडणूक आहे. मिझोरम विधानसभा निवडणुकीसाठी यावेळी 80 टक्के मतदान झाले असून मागील निवडणुकीपेक्षा 2 टक्के मतदान कमी झाले आहे. या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 2 तर भाजप अध्यक्ष अनिल शाह यांनी 2 प्रचारसभा घेतल्या होत्या.


2013 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक 34 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली होती. काँग्रेसचा मुख्य प्रतिस्पर्धी मिझो नॅशनल फ्रंटने 5 जागांवर तर मिझोरम पीपल्स फ्रंटने एका जागेवर विजय मिळवला होता. या निवडणुकीत भाजपला खातेही उघडता आले नव्हते.


Election Result Live Update


- मिझोरममध्ये एमएनएला स्पष्ट बहुमत, 20 जागांवर विजयी, काँग्रेस चार तर पाच जागी अपक्ष विजयी 


- सलग 13 वर्ष मिझोरमचे मुख्यमंत्री असलेल्या पी. लालथनहवला यांना दोन्ही ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला आहे. चंफाई साउथ आणि सेरछिप या दोन्ही मतदारसंघातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 


ताज्या आकडेवारीनुसार 10 वर्षाच्या नंतर MNF पुन्हा मिझोरमच्या सत्तेत येणार आहे. मतमोजणी सुरु असली तरी एमएनएफ 26 जागांवर आघाडीवर आहे. तर गेल्या विधानसभेला 32 जागा मिळवणाऱ्या काँग्रेस केवळ 5 जागांवर आघाडीवर आहे.  तर अन्य पक्ष 8 आणि भाजप एका जागेवर आघाडीवर आहे.  


-मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांचा पराभव 


- काँग्रेसची हार निश्चित, एमएनएफची मोठी आघाडी


- मिझोरममध्ये एमएनएफची मोठी आघाडी, काँग्रेस पराभवाच्या छायेत 


- मिझो नॅशनल फ्रंट 25, काँग्रेस 7, भाजप 1, इतर 5 जागेवर आघाडीवर


- मिझो नॅशनल फ्रंट 23, काँग्रेस 8, भाजप 1, इतर 2 जागेवर आघाडीवर


- मिझो नॅशनल फ्रंट 11, काँग्रेस 6, भाजप 1 जागेवर आघाडीवर


मिझो नॅशनल फ्रंट 19, काँग्रेस 6, भाजप 1, इतर 3 जागेवर आघाडीवर 


- काँग्रेसच्या हातून मिझोरम  निसटण्याची चिन्हे


ईशान्येतील सेव्हन-सिस्टर्समधील महत्वाचे असलेल्या मिझोरम विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडेही लक्ष लागून आहे. 40 सदस्यीय विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आज हाती येणार आहेत. मिझोरममध्ये मागील दहा वर्षांपासून काँग्रेसची सत्ता कायम असून  पु ललथनहवला हे मुख्यमंत्रिपदाची कमान  सांभाळून आहेत.


राज्यात यावेळी काँग्रेस आणि विरोधी मिझो नॅशनल फ्रंटमध्ये मुख्य लढत आहे. 2013 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक 34 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली होती. काँग्रेसचा मुख्य प्रतिस्पर्धी मिझो नॅशनल फ्रंटने 5 जागांवर तर मिझोरम पीपल्स फ्रंटने एका जागेवर विजय मिळवला होता. या निवडणुकीत भाजपला खातेही उघडता आले नव्हते.


यावेळी देखील मुख्य लढत काँग्रेस आणि मिझो नॅशनल फ्रंटमध्येच आहे. मात्र यावेळी भाजपने देखील जोर लावलेला दिसून येत आहे.
1987 ला स्थापन झालेल्या मिझोरम राज्य हे देशातले 23 वे राज्य आहे.


 मिझोरम विधानसभा निवडणुकीतील मुख्य मुद्दे


40 सदस्यीय विधानसभेत बहुमतासाठी 21जागांची आवश्यकता  


मिझोरममध्ये 2008 पासून काँग्रेस सत्तेवर आहे. तेंव्हापासून पु ललथनहवला हेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत.


मिझोरममधील ही  12 वी विधानसभा  निवडणूक आहे.
मिझोरम विधानसभा निवडणुकीसाठी यावेळी 80 टक्के मतदान झाले असून मागील निवडणुकीपेक्षा 2 टक्के मतदान कमी झाले आहे.


या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 2 तर भाजप अध्यक्ष अनिल शाह यांनी 2 प्रचारसभा घेतल्या होत्या.