BJP Gujarat Election Result: गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपनं (BJP) ऐतिहासिक विजय मिळवला आहे. गुजरातमध्ये (gujrat) भाजपनं सलग सातव्यांदा सत्ता मिळवली आहे. या विधानसभा निवडणुकीत गुजरातमध्ये काँग्रेसची (Congress) मात्र पुरती दाणादाण उडाली आहे. भाजपनं गुजरात विधानसभा निवडणुकीतील सर्व विक्रम मोडीत काढले आहे. गुजरातमध्ये भाजपने (Gujarat election result 2022) सर्व जुने विक्रम मोडून तब्बल 157 जागांवर विजय मिळवलाय. मतांच्या टक्केवारीचेही विक्रम मोडत भाजपने तब्बल 53 टक्के मतं मिळवली आहेत. 2022 ते 2027 पर्यंत गुजरातमध्ये भाजपचीच सत्ता असेल. भाजप गुजरातमध्ये (Gujarat election result 2022)सलग 37 वर्ष राज्य करणारा पक्ष ठरणार आहे. पश्चिम बंगालमध्ये (west bengal election) डाव्यांनी तब्बल 34 वर्ष सरकार चालवलं होतं. हाच विक्रम आता भाजप मोडीत काढणार आहे.


पश्चिम बंगालमध्ये डाव्यांनी सलग 34 वर्ष राज्य केलं होतं. 1977 ते 2011 या कालावधीत पश्चिम बंगालमध्ये डावे सत्ते होते. गुजरातमध्ये 2027 मध्ये भाजपच्या सत्तेला 37 वर्षे पूर्ण होतील. हा भाजपचा विक्रम होणार आहे. 1990 ला गुजरातमध्ये भाजप-जनता दल यांनी सरकार स्थापन केले होते. त्यानंतर 1995 पासून सलग 7 वेळा भाजप स्वबळावर सत्तेत आहे. 


पश्चिम बंगालमध्ये डाव्यांची कामगिरी -
1977 ते 2011 असे सलग सात पंचवार्षिक निवडणुकांमध्ये डाव्या पक्षांनी पश्चिम बंगालमध्ये सत्ता कायम ठेवली. या दरम्यान ज्योती बसू यांनी पाच वेळा तर बुद्धदेव भट्टाचार्य यांनी दोन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलं. बंगालमधल्या डाव्या पक्षांच्या सरकारमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं वर्चस्व होतं. 2011 साली डाव्या पक्षांनी बंगालमधील आपलं बहुमत गमावलं. बिमन बोस हे 2016 पासून आतापर्यंत पश्चिम बंगाल डाव्या आघाडीच्या समितीचे प्रमुख आहेत. पश्चिम बंगालमध्ये सध्या ममता बॅनर्जी सत्तेत आहेत. 


गुजरातमध्ये भाजपचा आलेख कसा राहिला?
1980 विधानसभा निवडणूक -  9 जागा
1985 विधानसभा निवडणूक - 11 जागा
1990  विधानसभा निवडणूक - 67 जागा
1995  विधानसभा निवडणूक - 121 जागा
1998  विधानसभा निवडणूक - 117 जागा 
2002  विधानसभा निवडणूक -127 जागा
2007  विधानसभा निवडणूक - 117 जागा
2012  विधानसभा निवडणूक - 115 जागा
2017  विधानसभा निवडणूक - 99 जागा 
2022  विधानसभा निवडणूक - 156 जागा


आणखी वाचा :
Gujarat election result 2022: बुडत्याचा पाय खोलात, गुजरातमध्ये काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदही मिळणं कठीण!