युती धर्म पाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शिवसेनेच्या मनधरणीसाठी प्रस्तावित नाणार प्रकल्प रद्द केल्यामुळे तळकोकणातील भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. या नाराजीतूनच प्रमोद जठार राजीनामा देणार आहेत.
"नाणारचा बळी जाणार असेल तर कोकणाला युती नको", भाजप नेते प्रमोद जठार यांची भूमिका
"नाणारचा बळी जाणार असेल तर कोकणाला युती नको," अशी भूमिका प्रमोद जठार यांनी काही दिवसांपूर्वी घेतली होती. तसंच "जर नाणार रद्द झाला, तर निवडणूक लढवण्याशिवाय मला पर्याय उरणार नाही. मी जनतेसमोर जाण्यास तयार आहे, मी घाबरणारा नाही. पण युतीच्या शिल्पकारांनी ती वेळ आणून देऊ नये," असा इशाराही प्रमोद जठार यांनी दिला होता.
नाणार प्रकल्प रद्द
नाणार प्रकल्प रद्द करावा अशी अट युतीसाठी शिवसेनेने भाजपसमोर ठेवली होती. त्या अटीची पूर्तता करत अखेर हा प्रकल्प रद्द करण्यात आला. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तीन दिवसांपूर्वी याची घोषणा केली. तसंच नाणार प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनी स्थानिक नागरिकांना परत करण्यात येणार असल्याचंही जाहीर केलं. याशिवाय
जिथले नागरिक प्रकल्पाचं स्वागत करतील त्या ठिकाणी हा रिफायनरी प्रकल्प स्थलांतरीत करण्यात येईल, अशी माहिती सुभाष देसाईंनी दिली.
संबंधित बातम्या
नाणार प्रकल्प रद्द झाल्याची अधिसूचना राजपत्रात प्रकाशित
नाणार रिफायनरी प्रकल्प ग्रामस्थांच्या विरोधामुळे अखेर रद्द, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती