आय स्पेशालिटी रुग्णालयात प्राण्याच्या डोळ्याच्या इन्फेक्शन पासून ते आधुनिक शस्त्रक्रियापर्यंत सर्व गोष्टी होतात. शस्त्रक्रिया करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि ऑपरेशन थिएटरची सुविधासुद्धा या रुग्णलयात आहे.
VIDEO | मुंबईतील प्राण्यांसाठी सुपर स्पेशालिटी आय क्लिनिक | एबीपी माझा
मानवाप्रमाणे प्राण्यांनासुद्धा डोळ्याचे आजार मोठ्या प्रमाणावर होतात, त्याकडे दुर्लक्ष झालं तर डोळा देखील निकामी होण्याची चिन्ह असतात. अशावेळी त्यांना योग्य ती तपासणी वेळीच करणं गरजेचं असतं. यासाठीच हे रुग्णालय सुरु करण्याची कल्पना आली असं डॉ कस्तुरी भाडसाळवे यांनी सांगितलं.
या रुग्णलयात श्वान, मांजर तसेच इतर पाळीव प्राण्यांचे डोळे तपासले जातात. तसेच आकाराने मोठे असलेल्या प्राण्याची तपासणी त्यांच्या जागी जाऊन केली जाते. त्यामुळे प्राण्यांसाठी हे रुग्णालय जीवनदाव देणारं असणार आहे.