मुंबई : अनेक पक्षांमधील मोठे नेते भारतीय जनता पक्षामध्ये येण्यास उत्सुक असल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षाची आगामी लोकसभा निवडणुकीमधील उमेदवारांची यादी आज (मंगळवारी)किंवा उद्या जाहीर होईल, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या उमेदवारांबाबत फडणवीस म्हणाले की, "आमच्या पक्षाच्या उमेदवारांबाबत फारसे वादविवाद नाहीत, त्यामुळे आज किंवा उद्यापर्यंत भाजपची पहिली यादी जाहीर करण्यात येईल. काही नावं राहिली आहेत. परंतु एक-दोन दिवसांमध्ये तो प्रश्नदेखील मिटवू."
फडणवीस म्हणाले की, "2014 साली लोकसभा निवडणुकांवेळी भाजपची देशात मोठी लाट होती. यावेळी त्याहून मोठी लाट आहे. अनेक पक्षांचे मोठे नेते भाजपत प्रवेश करत आहेत. तर अनेक पक्षांचे प्रमुख नेते भाजपत येण्यास उस्तुक आहेत. सध्या महायुतीसाठी अनुकूल वातावरण आहे."
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्यातील खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये फडणवीसांना याबाबत विचारले असता, आगे आगे देखो होता है क्या? असे सूचक विधान त्यांनी केले आहे.
भाजपची पहिली यादी आज किंवा उद्या, अनेक पक्षातले मोठे नेते भाजपच्या वाटेवर, मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Mar 2019 04:28 PM (IST)
अनेक पक्षांमधील मोठे नेते भारतीय जनता पक्षामध्ये येण्यास उत्सुक असल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -