मी एका भाजपच्या कॅबिनेट मंत्र्यांकडे गेलो होतो, त्यावेळी त्यांनी ‘चंपा’ माझं ऐकतील अस वाटत नाही, अशा शब्दात चंद्रकांत पाटलांचा उल्लेख केल्याचं अजित पवारांनी सांगितलं. पुण्यातील पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. तसेचं चंद्रकांत पाटील यांना आपण यासंदर्भात भेटल्यावर आवर्जून माहिती देणार आहोत असंही पवारांनी यावेळी स्पष्ट केलं. ‘आता मी स्वत: दादांना सांगणार आहे. की दादा तुम्ही ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसत होता त्याच शहाण्याने हा शब्द पहिल्यांदा वापरला,’ हे सांगणार आहोत असं पवार म्हणाले.
Ajit Pawar | भाजप मंत्र्याकडूनच चंद्रकांत पाटलांचा ‘चंपा' असा उल्लेख : अजित पवार | ABP Majha
देशपातळीवरील अनेक नेते प्रचाराला आले पण फक्त 370 चा मुद्दा घेतला. ही निवडणूक देशाची नाही तर राज्याची आहे. सत्ताधाऱ्यांनी राज्याचे विषय मांडायला हवे होते अस सांगत त्यांनी मोदी आणि शहांवर निशाणा साधला. भाजप-शिवसेनेमध्ये युती राहिली नाही, अनेक बंडखोर उभे आहेत, काहीजणांनी तर माघारही घेतली नाही मग कसली युती, असं म्हणत पवारांनी भाजप-शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं.
पंतप्रधान आपल्या उमेदवार प्रचाराला येतात त्यावेळी विरोधकांच्या सभा असतात. अनेक ठिकाणी त्यांच्यामुळे आमच्या सभा रद्द कराव्या लागल्या. यामध्ये हेलिकॉप्टर उडू दिले नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादीची एकत्रित एक सभा घ्यायच ठरल होत. पण त्यानंतर बराच वेळ गेला त्यामुळे एकत्रीत सभा होऊ शकली नाही असेही अजित पवार म्हणाले.