परिणय फुके यांचे धाकटे बंधू नितीन फुके शुक्रवारी रात्री त्यांच्या राहत्या घरातून रस्त्याने जात असताना नाना पटोले यांचा पुतण्या आणि काही समर्थकांनी त्यांना वाहनात कोंबलं. त्यानंतर नितीन फुके यांना पटोलेंच्या कार्यालयात घेऊन गेले आणि तिथे मारहाण केली. रात्री पैशांचं वाटप होत असल्याचा आक्षेप नाना पटोले समर्थकांचा होता. या घटनेत नितीन फुके गंभीर जखमी झाले असून त्यांना साकोलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
यानंतर हा वाद पोलिस स्टेशनला पोहोचला. इथे परिणय फुके समर्थक पोहोचले. त्यांनी नाना पटोले यांचे पुतणे जितेंद्र यांना बेदम मारहाण केल्याने ते देखील गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी साकोली पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. परिणय फुकेंच्या तक्रारीवरुन नाना पटोले आणि सहकाऱ्यांविरोधात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नाना पटोले यांच्या तक्रारीनंतर परिणय फुके आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.