Maithili Thakur Win Bihar Election 2025: बिहारचा रणसंग्राम एकतर्फी जिंकण्यात एनडीएला यश (Bihar Election Result 2025) आलंय. 243 जागांपैकी 202 जागा मिळवत भाजप, जेडीयू, लोजप या पक्षांनी एकतर्फी बाजी मारत एनडीएला बहुमत मिळवून दिलंय. या निवडणुकांमध्ये एनडीएनं जोरदार मुसंडी मारत एकतर्फी विजय मिळवलाय. भाजपला 89 तर जेडीयूनं 85 जागा मिळवल्यात. तर काँग्रेसला अवघ्या 6 आणि तेजस्वी यादवांच्या राजदला 25 जागांवर समाधान मानवं लागतंय. आता बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता लागलीय. 

Continues below advertisement

बिहार निवडणुकीत सर्वात हायव्होल्टेज लढतींपैकी एक असलेली लढत म्हणजे, अलीनगर विधानसभेतून (Alinagar Constituency Bihar Election Result) भाजप उमेदवार मैथिली ठाकूर (Maithili Thakur) जिंकली आहे. मैथिली ठाकूर हिने आरजेडी उमेदवार विनोद मिश्रा यांचा 11 हजार मतांनी पराभव केला आहे. मैथिली ठाकूर हिला 84,915 मतं मिळाली, तर विरोधी उमेदवार विनोद मिश्रा यांना 73,115 मतं मिळाली आहेत. (Maithili Thakur Win Or Not) केवळ 25 वर्षांच्या मैथिली ठाकूर यांनी हा विजय मिळवून बिहार विधानसभेतील सर्वात तरुण आमदार (Maithili Thakur Youngest MLA) होण्याचा मान मिळवला आहे.

विजयानंतर मैथिली ठाकूर काय म्हणाली? (Maithili Thakur Reaction After Win Bihar Election)

आज तुमच्या अफाट प्रेमामुळे, विश्वासामुळे आणि आशीर्वादांमुळे, मी फक्त तुमची प्रतिनिधी म्हणून नाही तर तुमची मुलगी म्हणून उभी आहे. हा विजय फक्त माझा नाही, हा अलीनगरचा आहे, अलीनगरमधील प्रत्येक घराचा आहे, मला आशीर्वाद देणाऱ्या प्रत्येक हाताचा आहे, असं मैथिली ठाकूरने सांगितले. तसेच भारतीय जनता पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे, या मोहिमेला जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे, पदाधिकारी आणि बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानते. हा माझा विजय नाही. हा तुमच्या विश्वासाचा विजय आहे. तुमचे प्रेम हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांचेही मी आभार मानते, ज्यांच्या प्रेरणा आणि मार्गदर्शनामुळे आमच्या संपूर्ण टीमला बळ मिळाले, असं मैथिली ठाकूर म्हणाली.

Continues below advertisement

नरेंद्र मोदी काय म्हणाले? (Narendra Modi Bihar Election Result 2025)

दरम्यान बिहार निवडणुकीवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवलीय. येत्या काळात कदाचित काँग्रेसचं विभाजन होऊ शकतं. काँग्रेसकडे देशासाठी कोणताही सकारात्मक दृष्टीकोन नाहीये. आज काँग्रेस मुस्लीम लीगी माओवादी काँग्रेस अर्थात एमएमसी बनली आहे, अशी टीका मोदींनी केली.

कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?, VIDEO:

संबंधित बातमी:

Bihar Election Result 2025 JDU Winner List: नितीश कुमारांच्या जदयू पार्टीला किती जागा?; विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर...