Bihar Election Result 2025 Devendra Fadnavis: बिहार विधानसभा निवडणुकीचा (Bihar Election Result 2025) आज निकाल आहे. आतापर्यंत (दुपारी 12.30) 243 पैकी 243 जागेचा कल हाती लागला आहे. यामध्ये एनडीए 189 जागांवर, महागठबंधन 50 जागांवर आणि इतर 4 जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, बिहार निवडणुकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या प्रचाराचा देखील एनडीएला फायदा झाल्याचे समोर येत आहे.

Continues below advertisement

बिहारमधील 61 मतदारसंघांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा प्रभाव पडला. बिहारमधील 61 मतदारसंघापैकी 49 मतदारसंघात एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7 जिल्ह्यात काही मतदारसंघात प्रचार केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये प्रचार सभा आणि रॅली केल्या होत्या. दरम्यान, मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात थोड्याच वेळात बिहार निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल जल्लोष केला जाणार आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार केलेले जिल्हे- (Devendra Fadnavis Bihar Election 2025)

- सारन - सिवान - पाटणा - मुझफ्फरपूर - सहरसा - खगडिया - समस्तीपूर 

Continues below advertisement

  1. सारन - 10 पैकी 9 एनडीए उमेदवार आघाडीवर 
  2. सिवान - 8 पैकी 6 एनडीए उमेदवार आघाडीवर 
  3. पाटणा - 14 पैकी 11 एनडीएचे उमेदवार आघाडीवर 
  4. मुझफ्फरपूर- 11 पैकी 10 एनडीए उमेदवार आमदार 
  5. सहरसा - 4 पैकी 3 एनडीए उमेदवार आघाडीवर 
  6. खगडिया - 4 पैकी चारही एनडीए उमेदवार आघाडीवर 
  7. समस्तीपूर - 10 पैकी 6 एनडीए उमेदवार आघाडीवर

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले? (Chandrashekar Bawankule On Bihar Election)

केंद्र सरकार आधीच मजबूत आहे, या निकालाने NDA आणखी मजबूत होईल. या निकालाने एनडीएची ताकद वाढून एनडीए आणखी घट्ट होणार आहे. निवडणूक नंतर आरोप-प्रत्यारोप होत राहती. पक्षात शिल्लक असलेले कार्यकर्ते पक्षात राहावे, संकुचित होत असलेली पार्टी वाचावी, यासाठी आता निवडणुकीनंतर आरोप प्रत्यारोप होतील. निकाल येण्यापूर्वीच राहुल गांधी विदेशात निघून गेले आहे. पुन्हा ईव्हीएमचे खेळ खेळले जातील. मतदार यादी चुकली होती, हे खेळ खेळले जातील. असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

2020  विधानसभा निवडणुकीचे निकाल (Bihar Election Result 2020)

मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने 74 जागा, जेडीयूने 43 आरजेडीने 75 , एलजेपीने 1, एआयएमआयएमने 5, काँग्रेसने 19, सीपीएमने 2, सीपीआयने 2 आणि बसपाने 1 जागा जिंकल्या होत्या.

बिहार निवडणुकीच्या निकालाचे सर्व अपडेट्स, VIDEO:

संबंधित बातमी:

Bihar Election Result 2025 Live Updates: अलीनगरमधून मैथिली ठाकूरची मोठी आघाडी; 6 फेऱ्यांनंतर 8,500 मतांनी आघाडीवर