Bihar Election Result 2025 Live Updates: एनडीएच्या विजयानं महिला आणि युवा हा नवा फॉर्म्युला बनवला : नरेंद्र मोदी
Bihar Election Result 2025 Live Updates in Marathi: बिहार निवडणूक निकाल 2025 चे पहिले कल हाती आले आहेत. पहिल्या कलामध्ये पहिल्या तासात भाजपप्रणित NDA ने 100 जागांवर आघाडी घेतली.
पार्श्वभूमी
Bihar Election Result 2025 Live Updates in Marathi: बिहार निवडणुकीचे कल हाती आल्यानंतर आता अंतिम निकाल जाहीर होत आहेत. भाजप एकूण 91 जागांवर आघाडीवर आहे. त्यापैकी 8 जागांवर विजय घोषित...More
विजयाचे ढोल बिहारमध्ये वाजले, कानठळ्या मात्र मुंबईत बसल्या!
२०१० ला कांग्रेसच्या राजवटीतल्या बिहार निकालात गप्प बसलेले आज ‘आयोगद्रोही’ कसे झाले?
बिहार तो झांकी है… मुंबई अभी बाकी है, महाराष्ट्रातही जनता धडा शिकवायला सज्ज!
सामना अग्रलेखाला भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचं ट्विटवरून प्रत्युत्तर
बिहारमध्ये विधानसभा विजयाचे ढोल - नगारे वाजल्यामुळे इथे मुंबईत काही जणांच्या कानठळ्या बसल्या आहेत.
सामना अग्रलेखातून निवडणूक आयोगावर खापर फोडणार्यांनो,
थोडा इतिहास वाचा आणि थोडा बुध्दीला ताण द्या. निकालाच्या धक्क्यानं तुम्ही विस्मरणात गेला असाल तर आठवण करून देतो.
२०१० ची बिहार निवडणूक आठवते का?
केंद्रात कांग्रेस सरकार होतं आणि बिहारमध्ये निकाल आला होता.
एनडीए : 206, महागठबंधन : 25, अन्य : 8.
तेव्हा कुठे गेला होता तुमचा आजचा ‘आयोगद्रोह’? तेव्हा तर मतदारांनी तुम्हाला ३३ च्या आत विरोधकांना गुंडाळलं होतं. त्यामुळे पराभवाची कारणं तरी जनतेला पटतील अशी सांगा. आजचा अग्रलेख वाचल्यानंतर लक्षात येतं की तुम्हाला खरंच आरामाची सक्त गरज आहे… आणि त्याहून जास्त आत्मपरीक्षणाची आवश्यकता आहे.
बिहारच्या जनतेने जातीवाद, जंगलराज नाकारलं आणि मंगलराजला मतं दिली
आता मुंबईसह महाराष्ट्रातील निवडणुकीत जनता तुम्हाला पुन्हा एकदा धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.
बिहार तो झांकी है मुंबई अभी बाकी है!
बिहारच्या विजयानंतर अजित पवार दिल्लीत अमित शाहांच्या भेटीला; दोन्ही नेत्यांमधे 25 मिनटं चर्चा; भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण!
बिहार विधानसभा निवडणुकीत मुख्य विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दल (RJD) ला मोठा धक्का बसला आहे. महागठबंधनाचा मुख्यमंत्री चेहरा असलेले तेजस्वी यादव यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण मतदारांनी त्यांना अपेक्षित साथ दिली नाही. महागठबंधनला 35 तर राष्ट्रीय जनता दल पक्षाला 25 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रीय जनता दलने या निवडणुकीत 50 यादव आणि 18 मुस्लिम उमेदवार दिले होते, तरीही निकाल अत्यंत निराशाजनक राहिले. परंपरागत MY (Muslim-Yadav) समीकरण या वेळी तुटताना स्पष्ट दिसले.
बिहार निवडणुकीत (Bihar vidhansabha) सगळे मुद्दे बाजुला पडले आहेत, विकास आणि सुशासन हाच प्रमुख मुद्दा ठरला. मोदीजी आणि नितीश कुमार यांचा चेहरा हाच प्रमुख मुद्दा ठरल्याचंही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं.
बिहारचा रणसंग्राम एकतर्फी जिंकण्यात एनडीएला यश आलंय. 243 जागांपैकी 202 जागा मिळवत भाजप, जेडीयू, लोजप या पक्षांनी एकतर्फी बाजी मारत एनडीएला बहुमत मिळवून दिलंय.
बिहारमध्ये देश विदेशातील गुंतवणूकदारांचं स्वागत : नरेंद्र मोदी
काँग्रेस आपल्या मित्रपक्षांना गिळतेय
काँग्रेस मित्रपक्षांची मदत घेत मोठी होत आहे.
तुमचा विश्वास हाच माझा प्राण आहे.
गंगा बिहारमधून बंगालला जाते, बंगालमधील जंगलराज उघडून टाकणार : नरेंद्र मोदी
लोकशाहीवर हल्ला करणाऱ्यांना जनतेनं धूळ चारली
बिहारमध्ये आता कधी जंगलराज परत येणार नाही.
बिहारच्या लोकांनी रेकॉर्डब्रेक मतदान केलं.
एनडीएच्या वतीनं बिहारच्या जनतेला नमन करतो
एनडीएच्या विजयानं महिला आणि युवा हा नवा फॉर्म्युला बनवला
बिहारच्या जनतेला आदरपूर्वक नमन करतो
आम्ही जनतेचे सेवक आहोत
कोणत्याही भीतीशिवाय लोकांनी मतदान केलं
बिहारमध्ये जेव्हा जंगलराज होतं तेव्हा ते काय काय होतं ते तुम्हाला माहिती आङे.
बिहारच्या जनतेनं जंगलराज ऐवजी विकासाला मतदान केलं. 2024 नंतर प्रत्येक निवडणुकीत भाजपचा विजय झाला आहे. हरियाणा भाजपनं हॅटट्रिक केली. महाराष्ट्रात लोकसभेला आमच्या जागा कमी झाल्या. महाराष्ट्राच्या जनतेनं लोकसभेचा व्याजासह हिशोब करत भाजपला विजयी केलं. दिल्लीच्या निवडणुकीत दिल्लीच्या जनतेनं तीन दशकानंतर भाजपला विजय केलं, असं जे.पी. नड्डा म्हणाले.
देवेंद्र फडणवीस : बिहारच्या जनतेचं आभार मानतो. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवला, नितीश कुमार यांच्या सुशासनावर विश्वास ठेवत प्रचंड मोठं बहुमत दिलेलं आहे. आकडेवारी पाहता 2010 चं रेकॉर्ड तुटण्याची शक्यता आहे. चिराग पासवान, जीतनराम मांझी, उपेंद्र कुशवाह यांच्यासोबत युती होती. त्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या विजयानंतर काँग्रेस पार्टी आणि राहुल गांधी यांनी देशात चालवलेल्या विखारी प्रचाराला उत्तर दिलं आङे. जनतेच्या बहुमताला विरोध करण्याला मतदारांनी उत्तर दिलं आहे.
Tejashwi Yadav : तेजस्वी यादव 21 व्या फेरीअखेर 4937 मतांनी आघाडीवर पोहोचले आहेत. तेजस्वी यादव सुरुवातीच्या अनेक फेऱ्यांमध्ये पिछाडीवर होते.
बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षानं अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. बिहारमध्ये काँग्रेसचा फक्त 1 जागेवर उमेदवार आघाडीवर आहे. विशेष बाब म्हणजे एमआयएम 6 जागांवर आघाडीवर आहे.
Bihar Election Result LIVE: बिहार विधानसभा निवडणुकीच्या ट्रेंडनुसार सर्व एनडीए पक्ष 200 जागांवर आघाडीवर आहेत. भाजपकडे 91 जागा, नितीश कुमार यांच्या जेडीयूकडे 78, चिराग पासवान यांच्या एलजेपीआरकडे 21, जीतन राम मांझी यांच्या एचएएमकडे 5 आणि उपेंद्र कुशवाह यांच्या आरएलएमकडे 4 जागा आहेत.
Bihar Election Result Breaking LIVE: बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल पूर्णपणे भाजपच्या बाजूनं असल्याचं दिसून येतंय. ट्रेंड्सवरून असं दिसतंय की, भाजपकडे नितीश कुमारशिवाय आणि महाआघाडी न तोडता बिहारमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी पुरेशी ताकद असू शकते. खरं तर, निवडणूक आयोगाच्या ट्रेंडमध्ये भाजप 91 जागांवर आघाडीवर असल्याचं दिसून आलं आहे. अंतिम निकाल या पातळीच्या आसपास असण्याची शक्यता आहे. याशिवाय, जर चिराग पासवान यांची 22 जागांवर आघाडी, एचएएमच्या 5 जागा आणि आरएलएमच्या 4 जागा जोडल्या तर एनडीएचा बहुमताचा आकडा म्हणजेच, 122 जागा गाठल्या जातील.
Bihar Election Result Live: बिहारमधील दानापूर विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार राम कृपाल यादव म्हणाले, "आतापर्यंत आलेल्या निकालांवरून असं दिसून येतं की, बिहारच्या लोकांनी एनडीएला पूर्ण पाठिंबा आणि आशीर्वाद दिला आहे आणि आम्ही मोठ्या विजयाच्या मार्गावर आहोत..."
Bihar Election Result Breaking LIVE: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बिहार निवडणूक निकालांबाबत एक ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये म्हणालेत की, "बिहाराच्या विधानसभा निवडणूक निकालानं धक्का बसण्याची गरज नाही निवडणूक आयोग आणि बी जे पी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते! एकदम महाराष्ट्र पॅटर्न! जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्याना 50 च्या आत संपवले!"
Bihar Election Result LIVE: बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल काँग्रेससाठी खूपच वाईट दिसत आहेत. दुपारी 12:45 वाजेपर्यंत, काँग्रेस त्यांच्याच मित्रपक्ष सीपीआय (एमएल) पेक्षा मागे पडली आहे. सीपीआय(एमएल) पाच जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस चार जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, असदुद्दीन ओवैसी यांचा एआयएमआयएम देखील पाच जागांवर आघाडीवर आहे.
Bihar Election Result Breaking LIVE: बिहारमध्ये एनडीएच्या दणदणीत विजयानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 6 वाजता भाजप मुख्यालयात पोहोचतील. बिहार निवडणुकीत एनडीएच्या विजयानंतर पंतप्रधान कार्यकर्त्यांना संबोधित करण्याची अपेक्षा आहे.
Sanjay Nirupam On Bihar Election Result LIVE: एकनाथ शिंदे यांचे नेते संजय निरुपम यांनी बिहारमधील एनडीएच्या संभाव्य विजयावरून काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, बिहारमधील लोकांनी जातीची बंधनं तोडून मतदान केलंय. काँग्रेस पक्षासाठी मत चोरीचा कोणताही मुद्दा नव्हता. एसआयआरच्या आधी आणि नंतर एनडीए जिंकला, म्हणजेच मतचोरी हा मुद्दा नव्हता. बिहारमध्ये एकनाथ शिंदे जिथे जिथे गेले तिथे एनडीए जिंकला, एनडीएची एकता आणि ताकद दाखवून दिली.
इतकेच नाही तर संजय निरुपम यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत पुढे म्हटले की, निवडणुकीदरम्यान राहुल गांधी सफारीवर होते आणि परदेश दौऱ्यावर होते. तेजस्वी यादवमध्ये अजूनही लोकांना लालू यादवांच्या जंगल राजची भिती दिसते.
Alinagar Election Result Live Result Updates: भाजपची मैथिली ठाकूर यांनी अलीनगरमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. मतमोजणीच्या सहा फेऱ्यांनंतर, मैथिली सध्या आरजेडीच्या विनोद मिश्रा यांच्यापेक्षा 8,544 मतांनी पुढे आहे. मतमोजणीच्या सहा फेऱ्यांनंतर, मैथिली ठाकूरनं 22,000 पेक्षा जास्त मतं मिळाली आहेत.
Bihar Elections Update: बिहारमधील NDA आणि भाजपची मोठ्या विजयाच्या दिशेनं वाटचाल सुरु असताना नागपुरात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे. संघ मुख्यालयजवळ बडकस चौक येथे भाजप कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी.
Bihar Election Result 2025 LIVE: एनडीए पुन्हा एकदा प्रचंड बहुमतानं सत्तेत येण्याच्या तयारीत असताना, पाटण्यात 'बिहार म्हणजे नितीश कुमार', असं लिहिलेलं पोस्टर लावण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी सकाळी मतमोजणी सुरू झाली, तेव्हा सत्ताधारी NDA 191 जागांवर आघाडीवर होते, जे बहुमताचा आकडा 122 पेक्षा जास्त होता. विरोधी महाआघाडी मागे पडली, 243 विधानसभेच्या जागांपैकी फक्त 48 जागांवर आघाडीवर होती.
Bihar Election 2025 LIVE: RJD च्या नेत्या सारिका पासवान म्हणाल्या की, "मतमोजणीच्या आणखी काही फेऱ्या पूर्ण होऊ द्या. आम्ही पुढे जाऊ..."
तेजस्वी 3,000 मतांनी मागे आहे, पण सध्या पाचव्या आणि सहाव्या फेरीची मोजणी सुरू आहे. तेजस्वी प्रचंड मतांनी विजयी होतील. बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार स्थापन होईल. तेजस्वी 18 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.
Bihar Election Result LIVE: बिहार विधानसभा निवडणुकीतील आतापर्यंतच्या कलांनी एनडीएला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. तेजस्वी यादव यांचा राजद बराच मागे आहे. दरम्यान, राजद नेत्या सारिका पासवान यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले. त्या म्हणाल्या, "अशा 60-70 जागा आहेत जिथे आम्ही 100-200 मतांनी मागे आहोत. त्यामुळे, हे कल निश्चित नाहीत. चित्र अजूनही बाहेर आहे. निकाल बदलतील; आम्हाला अजूनही आशा आहे."
Bihar Election Result Breaking LIVE: बिहार विधानसभा निवडणुकीतील सर्व 243 जागांसाठी निवडणूक आयोगाने ट्रेंड जाहीर केले आहेत. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. निवडणूक आयोगाच्या मते, भाजपने 85 जागांवर आघाडी घेतली आहे. नितीश कुमार यांचा जेडीयू 76 जागांवर आघाडीवर आहे. आरजेडी 34 जागांवर आघाडीवर आहे, तर रामविलास पासवान लोजपा 22 जागांवर आघाडीवर आहे.
Bihar Election Result LIVE: भारतीय निवडणूक आयोगाच्या मते, महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव हे राजदचा बालेकिल्ला असलेल्या राघोपूरमध्ये भाजपचे उमेदवार यांच्या पिछाडीवर आहेत. सकाळी 11:15 वाजेपर्यंत तेजस्वी यादव यांना 10,957 मतं मिळाली, तर भाजपचे सतीश कुमार यांना 12,230 मतं मिळाली.
Bihar Election Result Breaking LIVE: निवडणूक आयोगाच्या निवडणूक निकालानंतर दिग्विजय सिंह म्हणाले, "मला जे संशय होता तेच घडले. 62 लाख मतं कापण्यात आली आणि 20 लाख मते जोडण्यात आली. त्यापैकी 5 लाख मतं एसआयआर फॉर्म न भरता जोडण्यात आली. बहुतेक मते गरीब, दलित आणि अल्पसंख्याकांकडून कापण्यात आली. शिवाय, ईव्हीएमबद्दल शंका कायम आहेत. काँग्रेसनं आपल्या संघटनेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आजची निवडणूक मतदान केंद्रांवर सघन संपर्क साधण्याबद्दल आहे, रॅली आणि सार्वजनिक सभांबद्दल नाही. विजयी उमेदवारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा."
Bihar Election 2025 LIVE: बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, भाजप 83 जागांवर आघाडीवर आहे आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे. नितीश कुमार यांचा जेडीयू 79 जागांवर आघाडीवर आहे. तेजस्वी यादव यांच्या आरजेडीने 32 जागांवर आघाडी घेतली आहे आणि चिराग पासवान यांचा एलजेपीआर 22 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस आणि सीएमपीआयएमएल प्रत्येकी सहा जागांवर आघाडीवर आहेत.
Bihar Election Result Breaking LIVE: दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार मैथिली ठाकूर आघाडीवर आहेत. राजदचे विनोद मिश्रा 4000 हून अधिक मतांनी मागे आहेत. हे आकडे मतमोजणीच्या चार फेऱ्यांवर आधारित आहेत.
Bihar Election Result Breaking LIVE: तेजस्वी यादव अन् तेज प्रताप यादव दोघंही सध्या पिछाडीवर आहे.
Bihar Election Result Breaking LIVE: चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष सध्या 22 जागांवर आघाडीवर आहे. बिहार निवडणुकीत चिराग पासवान यांच्या पक्षाने 29 जागा लढवल्या होत्या.
Bihar Election Result Breaking LIVE: बिहारमधील विजय म्हणजे एनडीएचा विजय आहे. त्यामुळे जल्लोषात सहभागी होण्यासाठी खास तामिळनाडूहून एनडीए घटकपक्ष अण्णा द्रमुकचे कार्यकर्तेही पाटण्यात आले आहेत.
Bihar Election Result Breaking LIVE: बिहारमध्ये एनडीए सध्या 190 जागांवर आघाडीवर आहे. तर महागठबंधन 50 जागांवर आघाडीवर आहे.
Bihar Election Result Breaking LIVE: छपरा येथून खेसारीलाल यादव पिछाडीवर
गायक खेसारीलाल यादव 974 मतांनी पिछाडीवर
महाबली सिंह (जेडीयू): 8526 मते
अरुण कुमार (सीपीआयएमएल): 6567 मते
ज्योती सिंग (अपक्ष): 2403 मते
Bihar Election Result Breaking LIVE: जेडीयू नेते केसी त्यागी म्हणाले की, "मी निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं की, जेडीयू सुमारे 80 जागा जिंकेल. काँग्रेस पक्षाला त्यांचं धोरण बदलावं लागेल..."
Bihar Election Result 2025: वारसालीगंजमधील दुसऱ्या फेरीच्या मतदानात भाजप उमेदवार अरुणा देवी 2,993 मतांनी आघाडीवर आहेत. दरम्यान, अशोक महतो यांच्या पत्नी अनिता देवी पिछाडीवर आहेत.
Bihar Election Result LIVE: निवडणूक आयोगाच्या आतापर्यंतच्या कलांनुसार, भाजप आणि जेडीयू प्रत्येकी 70 जागांवर आघाडीवर आहेत. दोघेही समान आघाडीवर आहेत. पूर्वी, जेडीयू आणि भाजप कधीकधी आघाडीवर होते. आतापर्यंत दोन्ही आघाड्यांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे.
Bihar Election Result LIVE: वैशालीच्या राघोपूर मतदारसंघात, मतमोजणीच्या पहिल्या फेरीत आरजेडीचे तेजस्वी यादव यांना 4,563 मते मिळाली, तर भाजपचे सतीश राय यांना 3,570 मते मिळाली. आरजेडीच्या बालेकिल्ल्यात तेजस्वी यादव सध्या 893 मतांनी आघाडीवर आहेत.
Bihar Election Result Breaking LIVE: बिहार निवडणुकीच्या निकालांमधील सुरुवातीच्या ट्रेंडवरून एनडीए सरकार लवकरच येणार असल्याचे दिसून येते. त्यानंतर, जेडीयू कार्यकर्ते जेडीयू कार्यालयात येऊ लागले आहेत. ते म्हणतात, "आम्हाला केवळ आशा नव्हती, तर पूर्ण विश्वास होता की एनडीए सरकार स्थापन करेल आणि नितीश कुमार ते स्थापन करतील." जेडीयू कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह आणि उत्साह दिसून येतो.
Bihar Election Result Live: झाझा विधानसभेतील चित्र काय? कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर?
जेडीयूमधून दामोदर रावत आघाडीवर
जेडीयूचे दामोदर रावत : 4134 मतं
आरजेडीचे जयप्रकाश नारायण यादव : 3087 मतं
Bihar Election Result Live: बेतिया विधानसभेमधून रेणु देवी आघाडीवर
बिहार विधानसभा निवडणुकीच्या आतापर्यंतच्या कलांनुसार, शाहपूर विधानसभा से RJD चे राहुल तिवारी पहिल्या फेरीनंतर 3589 मतांनी पुढे.
बेतियामधून भाजपाच्या रेणु देवी 2000 मतांनी आघाडीवर...
Bihar Election Result Live: बगहा विधानसभातील पहिल्या फेरीचे आकडे
जयेश मंगल सिंह
4171
NDA प्रत्याशी राम सिंह
3784
जन सुराज प्रत्याशी नदेश पांडे
366
निर्दलीय प्रत्याशी दिनेश अग्रवाल
193
NDA : 160
महागठबंधन : 62
अन्य : 5
Bihar Election Result Live: निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, हाती आलेल्या सध्याच्या कलांनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष आहे.
भाजप : 20
जेडीयू : 15
आरजेडी : 6
काँग्रेस : 3
लोजपा (रा) : 3
इतर : 1
Bihar Election Result Breaking LIVE: पटनामध्ये बोलताना संजय झा म्हणाले की, एनडीए मोठ्या फरकानं निवडणूक जिंकेल. संपूर्ण बिहारला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावे असंच वाटतंय. नितीश कुमार हे बिहारमधील सर्वात लोकप्रिय नेते आहेत.
Begusarai Bihar Election 2025 LIVE: बेगुसराय जिल्ह्यातील सात विधानसभा जागांसाठी सुरुवातीचे कल हाती आले आहेत. हे कल अनेक जागांवर चुरशीच्या लढतीचे संकेत देत आहेत. काही जागांवर भाजप आणि जेडीयूचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर आरजेडी आणि सीपीआयचे उमेदवारही मजबूत पकड राखत आहेत. सुरुवातीच्या मतमोजणीत, सर्व पक्षांच्या प्रमुख उमेदवारांनी आपापल्या आघाडीची नोंद केली आहे.
बेगुसरायमध्ये कुंदन सिंह आघाडीवर आहेत. चेरिया बरियारपूरमध्ये अभिषेक आनंद आघाडीवर आहेत. बच्छवाडामध्ये सुरेंद्र मेहता आघाडीवर आहेत. तेघरामध्ये रजनीश सिंह आघाडीवर आहेत. मतिहानीमध्ये बोगो सिंह आघाडीवर आहेत. साहेबपूर कमलमध्ये लालन यादव आघाडीवर आहेत. बखरीमध्ये सूर्यकांत पासवान आघाडीवर आहेत. हे सुरुवातीचे ट्रेंड आहेत.
Bihar Election Result LIVE: बिहार विधानसभा निवडणुकीची (Bihar Election Result 2025) मतमोजणी सुरू आहे. अनेक जागांवरून सुरुवातीचे कल समोर आले आहेत. गायघाटमध्ये जेडीयूच्या कोमल सिंह आघाडीवर आहेत. धोरैयामध्ये जेडीयूचे मनीष कुमार आघाडीवर आहेत. दानापूरमध्ये भाजपचे रामकृपाल आघाडीवर आहेत. चेरिया बरियारपूरमध्ये जेडीयूचे अभिषेक आनंद आघाडीवर आहेत. छपरामध्ये आरजेडीचे उमेदवार खेसारी लाल आघाडीवर आहेत. जमालपूरमध्ये जेडीयूचे नचिकेता आघाडीवर आहेत.
Bihar Election Result Breaking LIVE: विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) मतमोजणी सुरू आहे. कोच्चाधामनमध्ये आरजेडीचे मुहिद आलम आघाडीवर आहेत. कुम्हरारमध्ये जनसुराजचे केसी सिन्हा आघाडीवर आहेत. कुधनीमध्ये भाजपचे केदार प्रसाद गुप्ता आघाडीवर आहेत. महाराजगंजमध्ये आरजेडीचे विशाल जयस्वाल आघाडीवर आहेत. महनारमध्ये जेडीयूचे उमेश कुशवाहा आघाडीवर आहेत.
आरामध्ये भाजपचे संजय टायगर आघाडीवर आहेत. सुपौल जिल्ह्यात, छतापूर मतदारसंघात भाजप आघाडीवर आहे, आणि निर्मली, पिप्रा आणि सुपौल मतदारसंघात जेडीयू आघाडीवर आहे. खगरियामध्ये, एनडीए खगरिया, अलौली आणि बेलदौर मतदारसंघात आघाडीवर आहे आणि परबट्टामध्ये आरजेडी आघाडीवर आहे.
ईव्हीएम मतमोजणीच्या पहिल्या फेरीत पाटेपूरमध्ये भाजपचे लखेंद्र रोशन आघाडीवर आहेत आणि महुआमध्ये एलजेपीचे संजय सिंह आघाडीवर आहेत. मोहिउद्दीननगरमध्ये आरजेडीचे अज्जा यादव, नबीनगरमध्ये जेडीयूचे चेतन आनंद आणि नोखामध्ये जेडीयूचे नागेंद्र चंद्रवंशी आघाडीवर आहेत. संदेशमध्ये राजदचे दीपू सिंह आघाडीवर आहेत. औरईमधून भाजपचे रामा निषाद आघाडीवर आहेत.
Bihar Election Result LIVE: सुरुवातीच्या कलांनुसार, जनशक्ती जनता दलाचे प्रमुख आणि लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यादव सुरुवातीला पिछाडीवर राहिल्यानंतर आता त्यांनी आघाडी घेतली आहे. महुआ मतदारसंघातून तेज प्रताप यादव आघाडीवर आहेत. त्यांनी 2015 मध्ये आरजेडीच्या तिकिटावर महुआ मतदारसंघ जिंकला होता. त्यांचा सामना आरजेडीचे विद्यमान आमदार मुकेश कुमार रोशन आणि लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) चे संजय कुमार सिंह यांच्याशी आहे.
Bihar Election Result Breaking LIVE: निवडणूक आयोगाच्या अधिकृत माहितीनुसार, सकाळी 8.30 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाच्या प्राथमिक कलांनुसार, भाजप पाच जागांवर, राजद दोन जागांवर, जेडीयू एका जागांवर आणि काँग्रेस एका जागी आघाडीवर आहे. हे आकडे निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर पाहता येतील. मतमोजणी सुरू आहे.
Bihar Election Result LIVE: बिहार निवडणुकीच्या ट्रेंडमध्ये एनडीए 135 जागांवर आघाडीवर असल्याचं दिसून आलंय. तेजस्वी यादव यांचा महाआघाडी 65 जागांवर आघाडीवर आहे, तर इतर पाच जागांवर पुढे आहेत.
Bihar Election Result LIVE: सकाळी 9 वाजेपर्यंत, एनडीए 122 जागांवर आघाडीवर आहे. महाआघाडी 73 जागांवर पुढे आहे. तेजस्वी यादव महत्त्वाच्या जागांवर पुढे आहेत. मुझफ्फरपूरच्या साक्रा विधानसभा मतदारसंघात जेडीयू सुमारे 1000 मतांनी आघाडीवर आहे.
Bihar Election 2025 LIVE: पोस्टल बॅलेटमध्ये विजय कुमार सिन्हा त्यांच्या जवळच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा पुढे आहेत. कुम्हारारमध्ये केसी सिन्हा (जनसुराज) आघाडीवर आहेत. मानेरमध्ये भाई वीरेंद्र आघाडीवर आहेत.
Bihar Election Result 2025 LIVE: बिहार विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये एनडीए 103 जागांवर आघाडीवर असल्याचं दिसून आलंय. म्हणजेच, सत्ताधारी पक्षानं शतकाचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, महाआघाडी 78 जागांवर पुढे आहे आणि इतर अजूनही सहा जागांवर आघाडीवर आहेत.
Bihar Election Result LIVE: बिहार निवडणुकीचे कल फारच चुरशीचे आहेत. सध्याचे आकडे एनडीए आणि महागठबंधन बरोबरीत आहे. दोन्ही पक्ष प्रत्येकी 91 जागांवर आघाडीवर आहेत.
Bihar Election Result Breaking LIVE: बिहारमध्ये एनडीए विरुद्ध महागठबंधन; कोण किती जागांवर आघाडीवर?
बिहारमध्ये एनडीए विरुद्ध महागठबंधन
एनडीएचे सुरुवातीचे कोण?
महागठबंधन सुरुवातीचे कोण?
Bihar Election 2025 LIVE: एचएएम नेते अनिल कुमार यांचे गयाजीमध्ये मोठं वक्तव्य.
नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री होतील. आम्ही सहा जागा जिंकू. आम्ही गयाजी जिल्ह्यात 10 जागा जिंकू...., असं ते म्हणाले आहेत.
Bihar Election Result Breaking LIVE: बिहार काँग्रेस अध्यक्ष राजेश राम कुटुंबा मतदारसंघात आघाडीवर आहेत, तर लालगंज मतदारसंघात शिवानी शुक्ला आघाडीवर आहेत.
Bihar Election Result 2025 LIVE: बिहार निवडणुकीतील सुरुवातीच्या ट्रेंडनुसार तारापूर मतदारसंघात भाजपचे उमेदवार आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी पिछाडीवर पडले आहेत. महाआघाडीचे उमेदवार, राजदचे अरुण कुमार हे या मतदारसंघात आघाडीवर आहेत.
Bihar Election Result 2025: कटिहारमध्ये जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ आहेत.
- कटिहारमध्ये व्हीआयपी सौरभ अग्रवाल आघाडीवर
- मनिहारीमध्ये जेडीयू सौरभ सुमन आघाडीवर
- बरारीमध्ये जेडीयू विजय सिंह निषाद आघाडीवर
- कडवामध्ये काँग्रेसचे शकील अहमद खान आघाडीवर
- प्राणपूरमध्ये भाजपच्या निशा सिंह आघाडीवर
- कोडामध्ये काँग्रेसच्या पूनम पासवान आघाडीवर
- बलरामपूरमध्ये सीपीआयएमएल-एमएल आघाडीवर
कटिहारमधील सात विधानसभा जागांपैकी एनडीएला तीन आणि महाआघाडीला चार जागा मिळण्याचा अंदाज आहे.
Bihar Election Result 2025: भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह यांच्या पत्नी ज्योती सिंह करकट मतदारसंघात पिछाडीवर आहेत. मतमोजणीपूर्वी ज्योती सिंह यांनी विजयाचा दावा केला होता आणि करकटचे लोक त्यांच्यासोबत असल्याचे म्हटले होते.
Bihar Election Result 2025 LIVE: दरभंगा मतमोजणी केंद्रावर जाण्यापूर्वी, बिहार सरकारचे जमीन आणि महसूल मंत्री संजय सरावगी यांनी त्यांच्या पत्नीसह श्यामा माई मंदिराला भेट दिली. त्यांनी आई श्यामासमोर नतमस्तक होऊन सलग सहाव्या निवडणुकीत विजयासाठी प्रार्थना केली.
Bihar Election Result 2025 LIVE: सकाळी 8:30 वाजेपर्यंत, एनडीए 75 जागांवर आणि महाआघाडी 38 जागांवर आघाडीवर आहे. इतर पक्षांचे उमेदवार सहा जागांवर आघाडीवर आहेत. आघाडीच्या उमेदवारांमध्ये तेजस्वी यादव, विजय सिन्हा, ओसामा शहाब आणि अनंत सिंह आघाडीवर आहेत.
Bihar Election Result 2025: बिहार सरकारचे मंत्री अशोक चौधरी म्हणाले की, "आम्ही एक्झिट पोल खोटे ठरतील... आम्ही दोन तृतीयांशपेक्षा जास्त बहुमतानं जिंकू."
Bihar Election Result 2025 LIVE: बिहार निवडणुकीच्या मतमोजणीत 100 हून अधिक जागांसाठीचे सुरुवातीचे कल समोर आले आहेत. एनडीए 75 जागांवर, महाआघाडी 38 जागांवर आणि इतर 6 जागांवर आघाडीवर आहेत.
Bihar Election Result 2025 LIVE: प्रशांत किशोर यांच्या जन सूरजचे मनीष कश्यप चनपाटिया विधानसभा मतदारसंघात आघाडीवर आहेत. प्रियंका गांधी यांनीही या मतदारसंघात काँग्रेससाठी प्रचार केला.
Bihar Election Result 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पोस्टल मतपत्रिकांनुसार एनडीएला 61, महाआघाडीला 32 आणि इतरांना 6 जागा मिळाल्या आहेत.
Bihar Election Result Live: सुरुवातीच्या कलांमध्ये महाआघाडी आणि एनडीए पक्षांची स्थिती
महागठबंधन
RJD- 24
Congress- 1
VIP-1
LEFT- 1
IIIP- 0
एनडीए
BJP- 22
JDU- 23
LJP- 3
HAM- 1
RLM- 1
Bihar Election Result 2025: जनशक्ती जनता दल (जेडी) प्रमुख तेज प्रताप यादव महुआ विधानसभेच्या जागेवर आघाडीवर आहेत. त्यांचे भाऊ तेजस्वी यादव हेही राघोपूर मतदारसंघातून आघाडीवर आहेत.
Bihar Election Result LIVE: बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी, राजद नेते विश्वनाथ कुमार सिंह म्हणाले की, "सर्वजण आम्हाला पाठिंबा देत आहेत, बिहारमध्ये बदलाची भावना आहे आणि तेजस्वी यांचं सरकार येतंय.."
Bihar Election Result 2025: सुरुवातीच्या पोस्टल बॅलेट कलांमध्ये छोटी कुमारी छपरामध्ये आघाडीवर आहे, तर खेसारी लाल यादव पिछाडीवर आहेत.
Bihar Election Result Live: अलीनगरमध्ये मैथिली ठाकूर आघाडीवर आहेत.
मोकामामध्ये अनंत सिंग आघाडीवर आहेत.
राघोपूरमध्ये तेजस्वी यादव आघाडीवर आहेत.
रघुनाथपूरमध्ये ओसामा शहाब आघाडीवर आहे.
तारापूरमध्ये सम्राट चौधरी आघाडीवर आहेत.
Bihar Election Result LIVE: बिहार निवडणुकीच्या (Bihar Elections 2025) मतमोजणीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये नितीश कुमार 13 जागांवर आघाडीवर आहेत, तर तेजस्वी यादव 8 जागांवर आघाडीवर आहेत. प्रशांत किशोर यांच्या पक्षासह इतर 5 जागांवर आघाडीवर आहेत.
Bihar Election Result Live: निवडणूक आयोगानं यावेळी एक बदल केला आहे. पोस्टल मतमोजणी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम मतमोजणीच्या शेवटच्या दोन फेऱ्या सुरू होणार नाहीत. (हे अशा क्षेत्रांना लागू होतं, जिथे पोस्टल मतपत्रिकांची संख्या जास्त असते आणि ईव्हीएम मोजणीनंतरही त्यांची मोजणी सुरू राहते...)
Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये, नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए दोन जागांवर, तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी तीन जागांवर आणि इतर चार जागांवर आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
Bihar Election Result 2025: बिहार विधानसभा निवडणुकीत मतमोजणी सुरू झाली आहे आणि पहिला ट्रेंड पोस्टल बॅलेट मोजणीतून समोर आला आहे. पहिला ट्रेंड प्रशांत किशोर यांच्या जन सूरजच्या बाजूनं आहे.
Bihar Election Result LIVE: तेजस्वी यादव यांच्या 'बदल होईलच' या वक्तव्याबद्दल जेडीयूचे प्रवक्ते नीरज कुमार म्हणाले की, "तेजस्वी यादव स्वतःबद्दल बोललेत. असं दिसतंय की, राघोपूरमध्ये बदल होईल... घराणेशाहीचं राजकारण आता अस्तित्वात राहणार नाही... बिहारचे लोक नितीश कुमारांवर विश्वास ठेवतील. लोक 36 वर्षांच्या व्यक्तीवर विश्वास ठेवणार नाहीत..."
Bihar Election Result LIVE: बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. सर्वात आधी पोस्टल मतपत्रिका मोजल्या जातील, त्यानंतर ईव्हीएम मतपत्रिका मोजल्या जातील. सुमारे एका तासांत पोस्टल मतमोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएमची मतमोजणी सुरू होतील.
Bihar Election Result Live: बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी तेजस्वी यादव यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. ते म्हणाले की, "बिहारमध्ये बदल होईल..." बिहार निवडणूक निकालापूर्वी तेजस्वी यादव आणि मीसा भारती एका गाडीतून निघाले आणि म्हणाले, "आम्ही जिंकणार आहोत... बदल होईल..."
Bihar Election Result Live: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बीएमपी 1 च्या मोठ्या संख्येनं गोरखा बटालियन तैनात करण्यात आल्या आहेत.
Bihar Election Result LIVE: राजद प्रवक्त्या सारिका पासवान यांनी सोशल मीडियावर काठी धरलेला स्वतःचा फोटो पोस्ट केला आणि कार्यकर्त्यांना तयार राहण्याचं आवाहन केलंय. ज्या अधिकाऱ्यांना शिक्षा करण्याचा अधिकार आहे, त्यांचं असंच होईल, असं त्यांनी म्हटलंय. त्यांनी इंस्टाग्रामवर लिहिलंय की, "जर बिहारच्या अधिकाऱ्यांनी गुजराती टोळीशी हातमिळवणी करून निवडणुकीत गैरप्रकार केला तर त्यांना जमिनीवर फेकले जाईल. गुजराती टोळी निघून जाईल, पण तुम्हाला तुमच्या कुटुंबासह येथेच राहावं लागेल. लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी तुम्ही घेतलेली शपथ पूर्ण करा, अन्यथा परिणामांसाठी तयार राहा."
Bihar Election Result Live: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांबाबत, महानगरपालिका आयुक्त शुभम कुमार म्हणाले की, "गोपालपूर, बिहपूर आणि सुलतानगंज विधानसभा जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी एक फोर्स मॅजिस्ट्रेट तैनात करण्यात आला आहे. सर्व उमेदवारांना माहिती देण्यात आली आहे आणि त्यांच्या मतदान एजंटना प्रवेश दिला जात आहे."
Bihar Election 2025 LIVE: राजद नेते मृत्युंजय तिवारी म्हणाले की, तेजस्वी यादव 18 नोव्हेंबर रोजी गांधी मैदानावर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. नितीश सरकार फक्त काही तासांचे पाहुणे आहे. त्यांच्या जाण्याची वेळ आली आहे. यावेळी 2020 प्रमाणे लोकशाहीचे तुकडे होऊ दिले जाणार नाहीत.
Bihar Elections LIVE: बिहार निवडणुकीच्या मतमोजणीच्या दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. एक्स-पोस्टमध्ये नितीश कुमार यांनी लिहिलंय की, "भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली..."
Bihar Election Result 2025 LIVE: महाराष्ट्र काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर झालेले सर्व एक्झिट पोल खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत. जनतेने यावेळी एनडीएला सत्तेचा दरवाजा दाखवला आहे आणि निकाल आल्यावर महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. वेगवेगळ्या चॅनेल्सनी मनमानी एक्झिट पोल दाखवले आहेत, परंतु जनतेचा मूड पूर्णपणे सरकारच्या विरोधात आहे. त्यांना विश्वास आहे की, अखिल भारतीय आघाडी बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन करेल.
Bihar Election Result 2025 Live: बिहारमधील सारण येथील छपरा येथील बाजार समितीत मतमोजणी केंद्र उभारण्यात आलं आहे. कडक सुरक्षा व्यवस्था आणि व्यवस्था ठेवण्यात आली आहे. छपरा हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. राजदचे उमेदवार खेसारी लाल यादव निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपनं छोटी कुमारीला उमेदवारी दिली आहे. ईव्हीएमवरून जनतेचा जनादेश कोणाला मिळेल हे स्पष्ट होईल.
Bihar Election Result 2025 Live: बिहार निवडणुकीच्या मतमोजणीवर मंत्री डॉ. प्रेम कुमार म्हणाले, "बिहारमधील जनता मोठ्या संख्येनं मतदान करण्यासाठी बाहेर पडली. एनडीए सर्व जागांवर आघाडी घेईल आणि बिहारमध्ये पुन्हा एनडीएचे सरकार स्थापन होईल. मला विश्वास आहे की, एनडीए सरकार 200 हून अधिक जागा जिंकेल. एनडीए सरकारनं केलेल्या विकासकामांमुळे जनता खूप खूश आहे."
Vijay Kumar Sinha On Bihar Election Result Live: उपमुख्यमंत्री विजय सिन्हा म्हणाले, "आज लोकशाहीच्या महान उत्सवाचा सर्वात ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा दिवस आहे. आजचे निकाल केवळ बिहारसाठीच नाही तर देशासाठी शुभ असतील. बिहार एक उदाहरण निर्माण करेल. जनताच मालक आहे, जनताच निर्णय घेईल. बिहारचे लोक या घराणेशाही लोकांचा... जंगलराजचे राजपुत्र, त्यांची जमीनदारी कधीही स्वीकारणार नाहीत. बिहारींनी अपमान होऊ नये. ज्यांनी ते अपमान बनवले आहे त्यांनी त्यापासून दूर राहावे. तेजस्वी यादव निराश झाले आहेत आणि हताश होऊन हे लोक धमक्या देत आहेत."
Bihar Election Result 2025: बिहार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजेश राम (Bihar Congress State President Rajesh Ram) म्हणाले, "जर मतमोजणी निष्पक्ष झाली तर आपण सरकार स्थापन करू. अखिल भारतीय आघाडीच्या सदस्यांनी चांगले लढा दिला. जनता उत्सव साजरा करते, पण नेते करत नाहीत."
Bihar Election Result 2025: मृतंजय तिवारी म्हणाले की, "मला खात्री आहे की आपण यशस्वी होऊ. नितीश सरकार जाणार हे निश्चित आहे. तेजस्वी सरकार येणार आहे. एनडीए काही तासांसाठी पाहुणे आहे. दुपारनंतर एनडीएचे जाणे निश्चित आहे."
Bihar Election Result 2025 Live: महाराष्ट्र काँग्रेस नेते आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी बिहार निवडणुकीशी संबंधित एक्झिट पोल, एसआयआर आणि मतांची चोरी यांसारख्या मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. जगताप म्हणाले की, ईव्हीएम आणि संपूर्ण कर्मचाऱ्यांचा वापर ज्या पद्धतीनं केला जातो, त्याच पद्धतीनं निकाल येतात ते निरर्थक आहे. हे फार काळ टिकणार नाही, कारण देशातील जनतेला त्यांची फसवणूक होत असल्याचं समजलं आहे. निवडणूक आयोग त्यांच्यावर सर्वात मोठा आघात करत आहे, तो म्हणजे त्यांना मतदानाचा संवैधानिक अधिकार हिरावून घेतला जात आहे.
Bihar Election Results 2025: विकासशील इंसान पक्षाचे प्रवक्ते देव ज्योती म्हणाले की, सर्व गरीब लोकांचे, सर्व कामगारांचे, कामगार वर्गाचे, कमी उत्पन्न गटांचे आणि आंबेडकरांच्या विचारसरणीचे पालन करणाऱ्या सर्वांचं सरकार येत आहे. सकाळी 10, 10:30 किंवा 11 वाजेपर्यंत तुम्हाला महागठबंधन सरकार स्थापन करताना दिसेल.
Bihar Election Results 2025 Live: पोस्टल मतपत्रिकांची सर्वात आधी मोजणी केली जाईल. बिहार विधानसभा निवडणुकीत पोस्टल मतपत्रिकांची प्रथम मोजणी केली जाईल. सकाळी 8:30 वाजता ईव्हीएम मतमोजणी सुरू होईल. राज्यातील 38 जिल्ह्यांमध्ये 46 केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत, जिथे 4,372 टेबलांवर मतमोजणी होईल.
- मुख्यपृष्ठ
- निवडणूक
- Bihar Election Result 2025 Live Updates: एनडीएच्या विजयानं महिला आणि युवा हा नवा फॉर्म्युला बनवला : नरेंद्र मोदी