भुसावळ मतदारसंघाचा उल्लेख करतांना मध्य रेल्वेचे देशातील एक महत्वपूर्ण ठिकाण, मध्यरेल्वेचे विभागीय कार्यालय असलेले शहर अशी ओळख. तिथे आणि जवळच असलेले वरणगाव शहरात आयुध निर्माण संस्था आहे तर दीपनगर येथील औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प देखील याच मतदारसंघात येतात. या मोठया प्रकल्पांमुळे स्थानिक रहिवाशांबरोबर देशातील अन्य भागातून नोकरीसाठी आलेल्या नागरिकांची संख्या देखील मोठी आहे. या मतदारसंघात अनुसूचित जाती आणि अल्पसंख्यांक समाजाचे प्राबल्य असल्याने सन 2009 च्या पुनरर्चनेत हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला.
हे ही वाचा - चोपडा विधानसभा मतदारसंघ : चंद्रकांत सोनवणे यांना विजयासाठी करावा लागणार संघर्ष
भुसावळ मतदारसंघाच्या इतिहासावर नजर टाकली तर 1962 ते 1990 पर्यंत हा मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व होते. 1995 आणि 1999 मध्ये शिवसेनेने आपला झेंडा फडकावला तर 2004 आणि 2009 मध्ये राष्ट्रवादीने ही जागा जिंकली. 2014 च्या मोदी लाटेत तत्कालीन आमदार संजय सावकारे यांनी राजकारणारी बदलते वारे ओळखत भाजपात प्रवेश करत केला आणि 2014 मध्ये भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत ही जागा सहज जिंकली.
हे ही वाचा - जामनेर विधानसभा मतदारसंघ : गिरीश महाजन यांचे एकहाती वर्चस्व
आज भुसावळ मतदारसंघावर वर्चस्व राखण्यासाठी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात शीतयुध्द सुरू आहे. संजय सावकारे हे खडसे गटाचे मानले जातात. अशा स्थितीत संजय सावकारेंना परत तिकीट मिळणार काय? गिरीश महाजन कुणाच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत भुसावळची जागा ही राष्ट्रवादीकडे असल्याने तेथे राष्ट्रवादीकडून अरविंद मानकरी, डॉ. सुरवाडकर, संधानशीव इच्छुक असले तरी भाजपला टक्कर देण्याइतपत या पक्षाची ताकद नाही. भाजपने जिल्ह्यात नेहमीच शिवसेनेला कमी लेखले असल्याने येथे शिवसेना भाजपसाठी कितपत मनापासून काम करते हे देखील महत्वाचे ठरणार आहे. युती न झाल्यास खरी लढत भाजप-शिवसेनेतच होईल.
हे ही वाचा -पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघ : विरोधात आमदार देण्याची परंपरा
भुसावळ विधानसभा मतदारसंघ | भाजपचे वर्चस्व कोण मोडीत काढणार?
चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव
Updated at:
11 Sep 2019 05:23 PM (IST)
भुसावळ मतदारसंघावर वर्चस्व राखण्यासाठी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात शीतयुध्द सुरू आहे. संजय सावकारे हे खडसे गटाचे मानले जातात. अशा स्थितीत संजय सावकारेंना परत तिकीट मिळणार काय? गिरीश महाजन कुणाच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -