रायपूर : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव करत काँग्रेसने छत्तीसगडमध्ये सत्ता मिळवली. काँग्रेसने छत्तीसगडमध्ये सत्ता स्थापन केली असून भूपेश बघेल यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

बघेल यांच्यासोबत आमदार टी एस सिंगदेव आणि आमदार ताम्रध्वज साहू यांनीदेखील आज मंत्रीपदाची शपथ घेतली. भूपेश बघेल यांच्या शपथविधीचे ज्या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते, तेथे जोरदार पाऊस सुरु झाल्याने शपथविधीचे स्थळ बदलण्यात आले. बलवीर सिंह जुनेजा इनडोअर स्टेडिअमवर बघेल यांचा शपथविधी सोहळा घेण्यात आला.

भाजपचा पराभव करत काँग्रेसने छत्तीसगडसह मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्येही सत्ता काबीज केली. आज दुपारी राजस्थानमध्ये अशोक गहलोत आणि मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग उपस्थित होते.




वाचा :  कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, शिवराजसिंहांच्या कृतीची प्रशंसा