भिवंडी ग्रामीण मतदारसंघातील प्रमुख लढती
- शांताराम मोरे, शिवसेना - विजयी
- महादेव घाटाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
भिवंडी ग्रामीण विधानसभा 2019 निकाल
- शांताराम मोरे (शिवसेना) - 83,567 मते (विजयी)
- शुभांगी गोवारी (मनसे) - 39,058 मते
भिवंडी ग्रामीण विधानसभा 2014 निकाल
- शांताराम मोरे (शिवसेना) - 57082 मते(विजयी)
- शांताराम पाटील (भाजप ) - 47922 मते
- दशरथ पाटील (मनसे )- 25580 मते
मतदारसंघातील समीकरणं
भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर आतापर्यंत या मतदार संघावर तब्बल 25 वर्ष भाजपचं वर्चस्व राहिलं आहे. 1990 ते 2009 या 25 वर्षांच्या काळात सेना भाजपच्या युतीचे भाजपचे माजी कॅबिनेट मंत्री विष्णू सावरा हे या मतदार संघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्हा विभक्त झाल्यामुळे 2014 च्या विधानसभा निवडणूकीत विष्णू सावरा यांनी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली. जिल्हा विभाजना बरोबरच युतीच बिनसल्यामुळे 25 वर्षांपासून एकत्र असलेले सेना भाजप हे मित्रपक्ष 2014 च्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात लढले. त्यामुळेच परंपरागत भाजपकडे असलेला मतदारसंघ शिवसेनेने लढवत भाजपवर मात केली.
मतदारसंघाचा इतिहास
या मतदार संघाचा राजकीय इतिहास पहिला तर 1990 पासून या मतदार संघातून भाजपचे आमदार विष्णू सावरा तब्बल पाच वेळा या मतदार संघाचे आमदार राहिले आहेत. विशेष म्हणजे 1980 पासून विष्णू सावरा हे या मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवत होते. मात्र 1980 ते 1990 या दहा वर्षांच्या काळात या मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व राहिले असून काँग्रेसचे शंकर गोवारी हे या मतदारसंघाचे आमदार होते. तर त्यानंतर 1990 च्या विधानसभा निवडणुकीत विष्णू सावरा यांनी काँग्रेसच्या लक्ष्मण दुमाडा यांचा 12 हजार 528 मतांनी पराभव करून हा मतदार संघ भाजपकडे खेचून घेतला. 1990 च्या निवडणुकीत भाजपचे विष्णू सावरा यांना 48 हजार 184 मते मिळाली होती तर काँग्रेसचे लक्ष्मण दुमाडा यांना 35 हजार 656 मते मिळाली होती. काँग्रेसकडून खेचून घेतलेला हा मतदार संघ तब्बल 25 वर्ष भाजपकडेच होता. मधल्या काळात भाजपला आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न केला मात्र तो यशस्वी झाला नाही. त्यामुळे या मतदार संघावर 2014 पर्यंत भाजपचेच वर्चस्व होते.
शांताराम मोरे सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात
2014 च्या विधानसभा निवडणुकीचे गणित पाहता शिवसेनेचे शांताराम मोरे यांचा 57 हजार 082 मतांनी विजय झाला होता. तर, 2019 साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उमेदवार शांताराम यांचा सलग दुसऱ्यांदा विजय झाला होता. आता शांताराम मोरे सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना वर्चस्व कायम ठेवण्यासाठी तगडं आव्हान आहे.