नागपूर: बारामती (Baramati Lok Sabha)  म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती हे गेली अनेक वर्षे राज्याच्या राजकारणात रुजलेलं समीकरण आहे.बारामती लोकसभेच्या जागेसाठी पवार घराण्यातील लढाई तीव्र झाल्यामुळे राष्ट्रवादी आणि पवारांच्या पारंपरिक प्रतिस्पर्धींना चुरशीच्या लढतीत महत्त्व प्राप्त झाले आहे. या मतदार संघाकडे राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे.  बारामतीत  सुनेत्रा पवारांना (Sunetra Pawar) मत म्हणजे मोदींना (PM Modi) मत तर  सुप्रिया सुळेंना (Supriya Sule)  मत म्हणजे राहुल गांधींना मत, असे वक्तव्य  देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis)   केले आहे. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते. 


देवेंद्र फडणवीस म्हणाले ,  सुनेत्रा पवार निवडून आल्या तर त्यांचा पाठिंबा मोदींना असेल आणि सुप्रिया निवडून आल्या तर त्यांचा पाठिंबा राहुल गांधींसाठी असेल.  सुनेत्रा पवार यांना दिलेला मत मोदींसाठी जाईल.  तर सुप्रिया सुळे यांना दिलेला मत राहुल गांधींना जाईल.  एवढं स्पष्ट मी सांगितलं आहे, आता काही लोकांना समजून घ्यायचं नसेल तर आम्ही काही करू शकत नाही.


मोदींच्या सभेनंतर वातावरण बदलेल


भाजपमध्ये मोदींवर विश्वास ठेऊन कोणीही प्रवेश करत असेल, तर त्याला कोणाचा विरोध असल्याचा कारणच नाही. खास करून जे राष्ट्रीय विचाराने प्रेरित आहे.  ज्यांच्यासाठी समाज व राष्ट्र प्रथम आहे अशा सर्वांनी मोदींसोबत राहिले पाहिजे. मोदींची पहिली सभा  महाराष्ट्रात होत आहे. प्रचंड उत्साह आहे.. मोदींच्या सभेनंतर वातावरण बदलेल . आधीच महाराष्ट्रात NDA  ला अनुकूलता आहे मोदींच्या सभेनंतर ती अनुकूलता आणखी वाढेल. 10 एप्रिलला रामटेक मतदार संघातही मोदींची एक सभा होणार आहे. 


पहिल्यांदाच पवार कुटुंबातील व्यक्ती आमनेसामने


गेल्या 3 दशकांपासून बारामती लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) या गेल्या 15 वर्षांपासून बारामतीच्या खासदार आहेत. मात्र, जुलै 2023 मध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. अजित पवार पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून घोषित करणार आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच पवार कुटुंबातील व्यक्ती निवडणुकीत एकमेकांसमोर असणार आहेत. 


हे ही वाचा :


Prakash Ambedkar : माझं भांडण शरद पवारांसोबत आहे, सुप्रिया सुळेंसोबत नाही; शरद पवारांनी आमच्या पक्षाचं... ; काय म्हणाले प्रकाश आंबेडकर