नागपूर : बारामतीत महायुती जिंकणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिन्ही नेते मिळून बारामतीचा करेक्ट कार्यक्रम करतील, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयावर प्रतिक्रिया दिली. 


इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत...


इंडिया आघाडीची बैठक म्हणजे, बारुंद नसलेला बॉम्ब अन् केवळ नाटक कंपनी आहे. सगळे नेते हॉटेलमध्ये राहून मुंबई फिरून निघून जातील, ना त्यांच्याकडे अजेंडा आहे, ना मुद्दे आहेत. फक्त मोदी विरोधात मोट बांधण्याचा देखाव्यासाठी येत आहेत. बैठकीला आलेल्या अनेक नेत्यांकडे मतदान नाही. यातील पक्षाचे किती मत महाराष्ट्रात आहे, ते दाखवा, आम्ही जिथे जिथे जात अहोत...लोक मोदींचा नावाने सहभागी होत आहे, 51 टक्के मत महायुतील मिळतील, असे बावनकुळे म्हणाले.


प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत काय म्हणाले ?


प्रकाश आंबेडकर यांना बोलवायचं हा निर्णय उद्धव ठाकरे यांचा निर्णय आहे, पण प्रकाश आंबेडकर यांची भूमिका काँग्रेस राष्ट्रवादीला कधीच पटली नाही. काँग्रेसची भूमिका मागासवर्गीय विरोधी आहे. काँग्रेस आंबेडकर विरोधी राहिली आहे. आधी काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध केला. आता इंडियाच्या बैठकीपासून प्रकाश आंबेडकर यांना दूर ठेवले.


प्रकाश आंबेडकरांनी जर का भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांचे स्वागत आहे. प्रकाश आंबेकर बोलले की भाजपसोबत जाण्यापासून मला काँग्रेस किंवा शिवसेनेने रोखले नाही, तर मी स्वतः रोखले असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.  


साखर कारखाना निर्णयावर काय म्हणाले ?


निर्णय शेतकरी शेतमजुरांसाठी असतात, त्यामुळे निर्णय हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी निर्णय होता, असे बावनकुळे म्हणाले. महादेव जानकर हे मित्र पक्षाचे नेते आहेत, सघटना वाढवताना उत्कृष्ट काम त्यांनी केलं आहे, महादेव जानकर हे घटक पक्षातील प्रमुख नेते असल्यानं त्यांची नाराजी असल्यास आम्ही दूर करू, असेही बावनकुळे यांनी सांगितले. 


भीमा कोरेगाव प्रकरणाची चौकशीबाबत बोलताना ते म्हणाले की, यात चौकशी समितीत कोणी कोणाचं नसते, बाहेर वक्तव्य करून तपास यंत्रणेवर दबाव आणण्याचं प्रयत्न असतो. 
 
कर्नाटकातील योजना बंद पडेल - 


कर्नाटकमध्ये गृहलक्ष्मी योजनेत दोन हजार रुपये गरीब कुटुंबांना देण्याची योजना शुभारंभ झालेली आहे. मात्र ती योजना लवकरात बंद पडेल.?.कारण त्यांनी दहा वर्षाचा बजेट एका वर्षात जरी खर्च केलं तरी लोकांना दिलेले आश्वासन पूर्ण करू शकणार नाहीत.  काँग्रेसने जनतेला फसवलं आहे... त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा बदला घेईल, असे बावनकुळे म्हणाले.