Assam Lok Sabha Result 2024 : आसाममधील लोकसभेच्या 14 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल थोड्याच वेळात समोर येणार आहेत. येथे तीन टप्प्यात निवडणुका झाल्या. 19 एप्रिल, 26 एप्रिल आणि ७ मे रोजी मतदान झाले. राज्यात भाजपचे सरकार आहे. आसाममध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये  मुख्य लढत पाहायला मिळाली आहे. 


काँग्रेसचे उमेदवार रकीबुल हुसैन विजयी


भाजपने दिब्रुगडमधून सर्बानंद सोनोवाल यांना उमेदवारी दिली होती. दरम्यान, जोरहाट मतदारसंघातून काँग्रेस नेते गौरव गोगोई निवडणूक रिंगणात होते. आसामच्या धुबरी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रकीबुल हुसैन हे विजयी झाले आहेत. रकीबुल हुसैन यांचा 672813 मतांनी विजय झाला. त्यांच्या मागोमाग एआययूडीएफचे उमेदवार बद्रुद्दीन अजमल दुसऱ्या क्रमांकावर आहेत.


2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने आसाममध्ये 14 पैकी 9 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला तीन जागा मिळाल्या होत्या. ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला एक जागा मिळाली. एक अपक्ष उमेदवार विजयी झाला होता.


आसाम लोकसभेचा 2014 आणि 2019 चा निकाल


2019 मध्ये भाजपने 9 जागा जिंकल्या (36.4%), काँग्रेसने तीन (35.8%), AIUDF ने एक जागा (7.9%) आणि अपक्षांनी एक जागा (4.3%) जिंकली. 2014 मध्ये, भाजपने 7 जागा जिंकल्या (36.9%), काँग्रेसने तीन (29.9%), AIUDF ने तीन जागा (15%) आणि अपक्षांनी एक जागा (9.6%) जिंकली.