Revanth Reddy on Ashok Chavan, नांदेड० : "अशोक चव्हाण यांनी किती अमाप संपत्ती कमावली आहे हे त्यांनाही माहित नसेल. त्यांचे मेहनतीचे पैसे नाहीत.  त्यांचे पैसे घ्या पण मत काँग्रेसच्या उमेदवारालाच करा", असे वक्तव्य तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत अण्णा रेड्डी यांनी केले. नांदेड जिल्ह्यातील भोकरमध्ये आयोजित प्रचार सभेत त्यांनी हे वक्तव्य केले. अशोक चव्हाण यांनी काही घाम गाळून पैसे कमावले नाहीत. त्यांच्या खिशातूनही पैसे काढून घ्या, ते ही कमी पडले तर त्यांच्या घरी जाऊन ज्या ज्या वस्तू आहेत त्यापण घेऊन टाका, असा अजब सल्ला रेवंत रेड्डी यांनी दिला.


रेवंत रेड्डी म्हणाले, आता विधानसभा निवडणुकीत या गद्दारांना धडा शिकवायचा आहे. पैसे भेटतील दारू पाजतील. त्यांनी मेहनतीने पैसा कमावलेला नाहीये. घाम गाळून पैसा कमवलेला नाहीये. जितके पैसे दिले तितके घ्या, त्याच्या खिशात जे काय असेल ते पण घ्या , घरात जाऊन घरात एक असेल ते पण घ्या.  कारण धोकेबाज आला धडा शिकवायचा आहे, पैसे देत असेल तर नकार देऊ नका, असं आवाहनही रेड्डी यांनी केलं.


निवडणुकीत इमानदार उमेदवार जिंकण महत्त्वाचा आहे. खोटारड्यांची देशाचा स्पर्धा लागली खोटं  बोलण्यात मोदी एक नंबरवर आहेत. मोदींना पराभूत करायचं आहे , अशोक चव्हाण यांना हरवायचं आहे, राजकारणात अशोक चव्हाण दिसू नये कारण त्यांनी तुमचं नाव खूप खराब केलं. तेलंगाना सरकारने दिलेल्या गॅरंटी पूर्ण केल्या , आम्ही कर्जमाफी केली, नोकऱ्या दिल्या. 50 हजार नोकऱ्या दिल्या. भाजपाला आव्हान आहे, येऊन मोजा एक नोकरी तरी कमी दिसली तर मी जाहीर माफी मागतो, असंही रेड्डी यांनी नमूद केलं. 


पुढे बोलताना रेवंत रेड्डी म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला, अजित पवार यांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला. ज्या काँग्रेसने अशोक चव्हाण यांना दोन वेळा मुख्यमंत्री केले त्यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खूपसला, अशी टीका तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत अण्णा रेड्डी यांनी केली. नांदेड जिल्ह्यातील भोकर मध्ये आयोजित प्रचार सभेत त्यांनी ही टीका केली. हे सर्वजण मिळून महाराष्ट्राला गद्दारांचा अड्डा बनवत आहेत, असा टोलाही त्यांनी लागावला.


इतर महत्त्वाच्या बातम्या  


Sharad Pawar : 'असं पाडा की महाराष्ट्रभर संदेश गेला पाहिजे, सगळ्यांचा नाद करायचा; शरद पवारांचा नाही'