Continues below advertisement

लातूर : विलासराव देशमुखांनी (Vilasrao Deshmukh) काही चांगली कामं केली, काही चुकीचं कामं केली. पण ते हयात नसताना त्यांच्यावर टीका करणं योग्य नाही अशा शब्दात एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. तसेच मी फक्त मोठ्या बापाचा मुलगा आहे असं सांगून राजकारण करता येत नाही. लातूरसाठी तुम्ही काय केलं याचा हिशोब द्या अशा शब्दात ओवैसींनी काँग्रेसचे आमदार अमित देशमुखांवर टीका केली.

एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी लातूरमध्ये माध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या संदर्भातील वक्तव्यावर स्पष्ट भूमिका मांडली. विलासराव देशमुख यांच्या काळात काही चांगली तर काही चुकीची कामे झाली, मात्र ते आता हयात नसल्याने त्यांच्या बाबतीत टीका करणं योग्य नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

Continues below advertisement

Asaduddin Owaisi On Amit Deshmukh : अमित देशमुखांनी कामाचा हिशोब मांडावा

लातूर शहरातील पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि ड्रेनेजसारख्या मूलभूत प्रश्नांवरून ओवैसींनी काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली. लातूरसाठी तुम्ही नेमकं काय केलंत? आता कोणत्या तोंडानं जनतेकडे मतदान मागणार आहात? असा थेट सवाल करत त्यांनी निवडणूक प्रचारात कामांचा हिशेब मांडण्याचं आव्हान दिलं.

घराणेशाहीवर प्रहार करताना ओवेसी म्हणाले, “मी मोठ्या बापाचा मुलगा आहे, वडील आमदार होते, असं सांगून राजकारण करता येत नाही. लोकप्रतिनिधी म्हणून काय कामं केलीत, ते जनतेसमोर ठेवा. मोठमोठ्या राजांचे महाल ओसाड पडले आहेत, मग वारसा सांगत बसण्यात अर्थ नाही.”

लातूरमधील नागरी समस्या अनेक वर्षांपासून ‘जैसे थे’ असल्याचा आरोप ओवैसी यांनी केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला मत म्हणजे भाजपाला मत, अजित पवार काकाचा होऊ शकले नाहीत मग लातूरचे कसे होणार? अशा शब्दात ओवैसींनी अजित पवारांवर टीका केली.

ट्रम्पचे नाव घेतल्यावर मोदी थंड का पडतात?

केंद्र सरकारवर टीका करताना ओवेसींनी ट्रम्पमोदी मुद्द्यावर थेट सवाल उपस्थित केला. “पंतप्रधान हा संपूर्ण देशाचा पंतप्रधान असतो. ट्रम्प विमानात उभे राहून मोदींबद्दल वक्तव्य करतात आणि 24 तास उलटूनही कुणी उत्तर देत नाही. ट्रम्पचं नाव घेतलं की तुम्ही का थंड होता?"

ही बातमी वाचा: