Border 2 actress: 23 जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या बॉर्डर 2 चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात सनी देओल,  वरूण धवन,   अहान शेट्टी आणि दिलजीत दोझांज  यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मेधा राणा देखील बॉर्डर 2 या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. मेधा हिनं अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिनं  'घर कब आओगे' या गाण्याबद्दल एक भावनिक पोस्ट लिहिली. ज्यामध्ये ती त्या गाण्याशी किती संबंधित आहे, याची माहिती तिनं पोस्टद्वारे दिली.  तिनं सैनिकाच्या बलिदानांबद्दल आणि घरी त्यांची वाट पाहणाऱ्या कुटुंबांबद्दल सांगितले. सध्या मेधा राणाची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Continues below advertisement

बॉर्डर 2 या चित्रपटात तिच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठ्या असलेल्या वरूण धवनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.  या चित्रपटात प्रमुख भूमिकेत मोना सिंह, सोनम बाजवा आणि आन्या सिंह झळकणार आहेत.  परंतु, मेधा राणा नक्की कोण? तिचा रूपरी पडद्यापर्यंतचा प्रवास नेमका कसा होता?   पाहूयात. मेधा राणा एका लष्करी कुटुंबातून येते. त्यांच्या कुटुंबातील तीन पिढ्यांनी  आर्म्ड फोर्सेज (सशस्त्र दल)मधून देशाची सेवा केली.  मेधा हिने   इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिनं लिहिलं की, "मी अशा कुटुंबातून आले आहे, जिथे माझ्या घरातील तीन पिढ्यांनी सशस्त्र दलात धैर्याने आणि अभिमानाने  सेवा केली. तसेच आमच्या परिवारातील महिलांनी कुटुंबाला पाठिंबा देत खंबीरपणे उभे राहिले आहेत". 

"हा प्रोजेक्ट  देशाची सेवा करणाऱ्या कुटुंबाना श्रद्धांजली आहे. माझे आजोबा, काका आणि वडील, जे सर्व सैनिक होते, त्यांच्या पाठीशी घरातील महिला होते. गणवेशातील पुरूषांसोबत खांद्याला खांदा लावून  उभे राहणाऱ्या  आमच्या धाडसी  महिलांनाही मी सलाम करते", मेधा राणा हिने ही  पोस्ट सोशल मीडियात शेअर केली. ही  पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Continues below advertisement

मेधा राणा नक्की कोण?

मेधा राणाचा जन्म 25 डिसेंबर 1999 रोजी गुडगाव येथे झाला. ती एका लष्करी कुटुंबात वाढली. तिचे वडील भारतीय सैन्यात होते. मेधाने  चंदीदडमधील कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल, नंतर बंदळुरूमधील आर्मी पब्लिक स्कूलमधून शिक्षण घेतले. त्यानंतर तिने क्राइस्ट विद्यापीठातून बीबीएची डिग्री घेतली. मेधा राणाच्या वडिलांचे नाव सुनील राणा  तर, आईचे नाव रितू  राणा आहे.  तिला प्रियंका राणा ही एक बहीण देखील आहे.