Anil Deshmukh मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी 100 कोटींच्या वसुलीचे (Anil Deshmukh 100 crore bribery case) आरोप केले. या प्रकरणात चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती चांदीवाल (Chandiwal Commission) यांनी आपल्या अहवालात आपण देशमुखांना क्लीनचीट दिलेली नाही असं म्हटलंय. एबीपी माझाचे ज्येष्ठ प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी न्या. चांदीवाल यांची EXCLUSIVE मुलाखत घेतली. या मुलाखतीत न्या. चांदीवाल यांनी स्फोटक आणि खळबळजनक गौप्यस्फोट करत अनेक बाबी उघड केल्या आहेत.
दरम्यान, याच मुद्द्यावरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी स्पष्टीकरण देत प्रत्युत्तर दिले आहे. न्यायमूर्ती चांदीवाल (Chandiwal Commission) अहवालात क्लीन चीट असा शब्द नसेल ही, मात्र त्यांनी सरळ सांगितले आहे की अनिल देशमुख विरोधात आमच्याकडे कुठलेही पुरावे नाही. सचिन वाझे यांनी सांगितले अनिल देशमुख ने मला पैसे मागितले नाही, त्यांनी साक्षमध्ये न्या. चांदिवाल समोर हे सांगितले आहे. म्हणून अहवालात असे आहे की अनिल देशमुख बद्दल पुरावे नाही. असेही अनिल देशमुख म्हणाले.
मी जेलमध्ये होतो, माझी आणि वाझे यांची भेट कशी होणार?
सचिन वाझे आणि तुमची भेट चौकशीच्या काळात झाली होती आणि त्यानंतर वाझे यांची भाषा बदलली, असा प्रश्न अनिल देशमुख यांना विचारला असता या प्रश्नावर अनिल देशमुख म्हणाले की, मी त्यावेळी जेलमध्ये होतो, माझी आणि वाझे यांची भेट कशी होणार, मी तर आर्थर रोड जेलमध्ये होतो. माझी कोणतीही भेट वाझे सोबत झालेली नाही. ठाण्याचे एक डीसीपी चौकशीत हस्तक्षेप करू पाहत होते. तुम्ही त्यांना ओळखता का? असं पुढे विचारले असता, आमच्याकडे सव्वा लाख पोलीस अधिकारी आहेत. त्यात कोणता मी तो अधिकारी (dcp) कोणता समजू? असा प्रतीप्रश्न देशमुख यांनी विचारला आहे.
अहवाल सार्वजनिक करावा, चित्र स्पष्ट होईल
1400 पानांचा अहवाल आहे, त्यात सर्व साक्ष पुरावे झाले आहेत. आज ही माझी मागणी आहे की अहवाल सार्वजनिक करवा. सचिन वाझे आणि परमवीर सिंह चौकशी आयोगाला सहकार्य करत नव्हते का? असा प्रश्न विचारला असता अनिल देशमुख म्हणाले की, परमवीर सिंह सहा समन्स पाठवून ही आले नाही. नंतर एफीडेविट केला की अनिल देशमुख विरोधात माझ्याकडे कोणतेही पुरावे नाही. सचिन वाझेने ही आयोगासमोर सांगितले होते की पुरावे नाही. दरम्यान, हा अहवाल राज्य सरकार ने जनेते समोर ठेवावा. त्यातून कोणाची साक्ष झाली, कोणाबद्दल पुरावे आहे, हे स्पष्ट होईल. मी अनेक दिवसापूर्वी पासून ही मागणी करतो आहे की अहवाल सार्वजनिक करावा..
WhatsApp chat मध्ये तुमच्या मुलाने 40 लाख मागितल्याचा उल्लेख होता, तो ही आयोगासमोर मांडण्यात आला होता, या प्रश्नावर अनिल देशमुख म्हणाले की, माझ्या मुलांना कधीच चौकशी आयोगाने बोलावले नाही. वाझेने न्या. चांदीवाल यांना whatsapp दाखवले असेल, ते चांदिवाल यांना महत्वाचे वाटले नसावे, म्हणून सलील देशमुख ला चौकशी साठी बोलावले गेले नाही. असेही ते म्हणाले.
आणखी वाचा
अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही; न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा