मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून आज 12 दिवस झाले. राज्यात अद्याप मुख्यमंत्री पदासाठीच्या चर्चा सुरू होत्या, आज महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यांबाबतचा सस्पेंस बुधवारी (4 डिसेंबर 2024) अखेर संपला. मुख्यमंत्र्यांबाबतचे आत्तापर्यंत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या चर्चा राज्यभरात सुरू होत्या, त्या चर्चा आज खऱ्या ठरल्या आणि पुन्हा एकदा महायुतीतील भारतीय जनता पक्षाने (भाजप) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मुख्यमंत्री होण्याची संधी दिली. आज महायुतीच्या तिन्ही पक्षातील नेत्यांनी राज्यपालांसमोर सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. उद्या (गुरूवारी) मुंबईत शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी सुरू झाली असली तरी या घोषणेनंतर एक प्रश्नही निर्माण झाला आहे त्याचबरोबर या एका प्रश्नाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपने तोच फॉर्मूला का स्वीकारला नाही, हा प्रश्न आहे. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही भाजप पक्षाने नव्या चेहऱ्याला संधी का दिली नाही? याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या कारणांमुळे येथे नवीन फॉर्म्युला लागू झाला नाही
महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची गणना अनुभवी आणि चांगल्या प्रतिमेच्या नेत्यांमध्ये केली जाते. ते सहा वेळा आमदारकीच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. संघटनांपासून ते सरकारपर्यंत त्यांनी काम केले आहे. त्यांचा प्रत्येक वर्गात आणि क्षेत्रात चांगला अनुभव आहे असे मानले जाते. संघाचे तसेच वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत.
त्याचबरोबर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारच्या आधी देवेंद्र फडणवीस हे 2014 ते 2019 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ऑक्टोबर 2019 मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, परंतु शिवसेनेने पाठिंबा काढून घेतल्याने 3 दिवसांनी त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांना सोबत आणल्यानंतर भाजपने त्यांच्यासोबत सरकार स्थापन केले आणि तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उपमुख्यमंत्री केले. मोठ्या जबाबदाऱ्या पुन्हा पुन्हा मिळाल्याने फडणवीस (Devendra Fadnavis) यांची लोकप्रियता बऱ्यापैकी असल्याचे दिसून येते.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजप विरोधी पक्ष झाला तेव्हाही फडणवीसांनी (Devendra Fadnavis) चांगले काम केले. फडणवीस (Devendra Fadnavis) विरोधी पक्षनेते होते. मग त्यांनी कोरोनाच्या काळात अराजकतेपासून भ्रष्टाचारापर्यंतच्या मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मविआ सरकारवर जोरदार हल्लाबोल होता. त्यांच्या टीकेमुळे उद्धव सरकार अनेकवेळा बॅकफूटवर दिसले. इथूनही फडणवीसांचा (Devendra Fadnavis) दर्जा वाढला.
2022 मध्ये जेव्हा शिवसेना फुटली आणि शिंदे काही आमदारांसह भाजपमध्ये आले, तेव्हा भाजपकडे जास्त आमदार होते, परंतु येथे फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सरकार स्थापनेवर पूर्ण लक्ष केंद्रित केले आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची खुर्ची दिली. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री (Devendra Fadnavis) राहिले. पक्षाच्या हायकमांडच्या निर्णयाला त्यांनी कधीही विरोध केला नाही. यामुळे एक चांगला नेता अशी त्यांची प्रतिमाही पक्षात निर्माण झाली.
2024 च्या विधानसभा निवडणुकीतही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महायुती समोरील सर्व आव्हानांचा चांगल्या फ्रकारे सामना केला आणि त्यावर चांगला तोडगा काढला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांसोबत जागावाटप असो किंवा स्थानिक समस्या मांडणे असो. देवेंद्र फडणवीस सर्वत्र अष्टपैलू म्हणून चर्चेत आले.
आणखी वाचा - Ajit Pawar: अजित पवारांची दिल्लीवारी कशासाठी? स्व:ताच केला खुलासा, म्हणाले 'मी कोणाला भेटण्यासाठी...'