Ajit Pawar vs Harashwardhan Patil, Indapur : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra Vidhanasabha Election ) जाहीर झाल्यापासून इंदापूर विधानसभा मतदारसंघात सातत्याने मोठ्या घडामोडी घडत आहे. महायुतीत इंदापूरचे जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जाणार याची चाहूल लागताच हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आता शरद पवार हर्षवर्धन पाटलांसाठी ताकद लावताना दिसत आहेत. दरम्यान, दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दत्तात्रय भरणे यांना निवडून आणण्यासाठी जोर लावताना दिसत आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशामुळे इंदापुरातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अनेक नेते नाराज झाले होते. त्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी सुरु केलाय.
आप्पासाहेब जगदाळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज (दि.3) हर्षवर्धन पाटलांसाठी इंदापुरात गेले होते. हर्षवर्धन पाटील यांच्याबाबत पक्षात असलेली नाराजी दूर करण्याचे प्रयत्न शरद पवारांनी सुरु केले आहेत. परंतु, शरद पवारांचा एक नेता शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या गोठात येणार आहे. इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले आप्पासाहेब जगदाळे यांनी दत्तात्रय भरणे यांच्या सोबत काम करण्याचा निर्णय घेतलाय. आगामी काळात ते अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचे आप्पासाहेब जगदाळे यांनी सांगितलं. ते आज इंदापुरात पत्रकारांशी बोलत होते.
हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची मध्यस्थी
शरद पवार आज इंदापुरात गेले होते. त्यांनी जवळपास इंदापुरातील राजकारणात सक्रिय असलेल्या मोठा 4 मोठ्या घराण्यांच्या भेटी घेतल्या. हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शहा कुटुंब देखील नाराज झाले होते. त्यांच्या घरी जाऊन शरद पवारांनी नाराजी दूर करण्यासाठी मध्यस्थी केली. परंतु, आता शरद पवारांचा एक नेता शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या गोठात येणार आहे. इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले आप्पासाहेब जगदाळे यांनी दत्तात्रय भरणे यांच्या सोबत काम करण्याचा निर्णय घेतलाय. आगामी काळात ते अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचा आप्पासाहेब जगदाळे यांनी सांगितलं.