जालना: लोकसभा निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षामुळे चर्चेत राहिलेल्या मराठवाड्यात विधानसभा निवडणुकीत काय होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मराठा समाजाची एकगठ्ठा मतं मविआच्या उमेदवारांना मिळाल्याने महायुतीला झटका बसला होता. अशातच आता विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवस शिल्लक असताना भाजप नेते बबनराव लोणीकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आष्टीतील प्रचारसभेतील आहे. या व्हिडीओत बबनराव लोणीकर आष्टीतील अठरापगड जातीचा समाज कशाप्रकारे आपल्या पाठीशी आहेत, हे सांगत होते. मात्र, या नादात त्यांनी मराठा समाजाबाबत केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. या गावात मराठा समाजाची कांड्यावर मोजण्याइतकी मतं आहेत, असे बबनराव लोणीकर व्हिडीओ म्हणताना दिसत आहेत.
या गावात अठरापगड जातीचे लोक आहेत. मराठा समाजाची गावात कांड्यावर मोजण्याइतकी मतं आहेत. मात्र, हे गाव सर्व समाजाचे आहे. गावातील सगळ्या जातीधर्माचे लोक माझ्यासोबत आहेत. मराठा, धनगर, माळी, फुलारी, आगलावे, शेट्ट्ये, कांदारे, कांबळे असा सगळा समाज माझ्यासोबत आहे. मी 40 वर्षे राजकारणात असून सगळेजण माझ्यावर प्रेम करतात, असे बबनराव लोणीकर यांनी व्हिडीओत म्हटले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. बोटाच्या कांड्यावर मोजण्याइतका मराठा समाजच तुम्हाला निवडणुकीत पाडेल, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
बबनराव लोणीकरांचं स्पष्टीकरण
या सगळ्या वादानंतर बबनराव लोणीकर यांनी आपली बाजू मांडली आहे. त्यांनी म्हटले की, आष्टी गावात माझी अभुतपूर्व रॅली झाली. या रॅलीला खेड्यापाड्यातील कार्यकर्ते आणि लोक मिळून तब्बल 3 हजार जण होते. यावेळी आज आष्टी गावात अभुतूपर्व रॅली झाली, खेड्यापाड्यातील 3000 लोक सहभागी झाले होते. सगळे कार्यकर्ते होते. आष्टीचं कौतुक करत असताना मी म्हणालो की, मराठा समाजाची मतं या गावात कमी आहेत. हे गाव एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेएनटी, मुस्लीम अशा अठरापगड जातीचं आहे. मी ४० वर्षे राजकारणात काम करताना या गावाने मला आणि भाजपला लीड दिली.मराठा समाजाची 60 ते 70 टक्के मला भाजपला मिळतात. पण काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या लोकांनी मोडतोड करुन व्हीडिओ व्हायरल केला तो खोटा आहे.मला अठरापगड जातीचे लोक मला २५ हजारंच्या मताधिक्याने निवडून देतात. कारण मी काम करतो, लोकांच्या सुख-दु:खात सहभागी होतो. पण काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या लोकांनी चुकीचा व्हीडिओ व्हायरल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मराठा समाज 40 वर्षे माझ्या पाठीशी होता, आताही आहे, मला मला लीड मिळणार आहे, असे बबनराव लोणीकर यांनी म्हटले.
आणखी वाचा