औरंगाबादमधील सभेनंतर असदुद्दीन ओवेसींचा ठेका, व्हिडीओ व्हायरल
एबीपी माझा वेब टीम | 19 Oct 2019 02:47 PM (IST)
असदुद्दीन ओवेसी कायम आपल्या तिखट वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. पण अशाप्रकारे हातात हात घेऊन डान्स करणाऱ्या ओवेसींचा व्हिडीओ पहिल्यांदाच समोर आला आहे.
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. औरंगाबादमध्ये प्रचार सभेनंतर ओवेसी यांनी असदुद्दीन ओवेसी एका गाण्यावर ठेका धरल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहेत. औरंगाबाद पैठण गेट इथे गुरुवारी (17 ऑक्टोबर) एमआयएमची सभा झाली. सभा झाल्यानंतर इथे 'मियाँ मियाँ, मियाँ भाई' हे गाणं लागलं होतं. यावेळी पायऱ्या उतरत असतानाच असदुद्दीन ओवेसींनी काही सेकंद त्यावर ठेका धरला. त्यांच्या हातात फुलांचा हारही दिसत आहे. असदुद्दीन ओवेसी कायम आपल्या तिखट वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. पण अशाप्रकारे हातात हात घेऊन डान्स करणाऱ्या ओवेसींचा व्हिडीओ पहिल्यांदाच समोर आला आहे. दरम्यान, असदुद्दीन ओवेसी औरंगाबादेत घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत.